Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

Snakes In FIFA World Cup: World Cup 2026 दरम्यान जर्मनी संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप दिसल्याने मोठी खळबळ उडाली असून खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या संघांनीही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 04:46 PM
FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली
Follow Us
Follow Us:
  • World Cup मध्ये विषारी ‘सापांचा’ धोका
  • जर्मनीची टीम थोडक्यात बचावली
  • स्विस कॅम्पच्या परिसरात प्रवेशबंदी क्षेत्र
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World CUP 2026) सुरू झाला आहे. सामन्यांचा थराराही वाढत आहे. परंतु, फिफा विश्वचषकाच्या २३ व्या हंगामात, खेळाच्या थराराबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान, जर्मन संगाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, जर्मन संघाच्या कोणत्याही खेळाडूला काहीही झाले नाही. ते थोडक्यात बचावले. परंतु, या स्पर्धेत सापांची भीती केवळ जर्मनीवरच हावी झालेली दिसत नाही, तर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Women’s T20 World Cup मध्ये भारताचा दुसरा सामना आज; सेमीफायनलवर टीम इंडियाची नजर, पाहा नेदरलँड्सविरुद्ध संभाव्य Playing 11

जर्मनीच्या कर्णधारानेही व्यक्त केली चिंता

जर्मन संघाचा कर्णधार, जोशुआ किमिच याने बीबीसी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रेनिंग कॅम्पमध्ये दिसलेल्या सापाबद्दल चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, “जर्मनीमध्ये तुम्ही रणनीती, दुखापती आणि पुढच्या प्रतिस्पर्ध्याचा विचार करता. इथे, गवतात काय दडलेले असू शकते याचाही विचार करावा लागतो. जर्मन कर्णधाराने स्पष्ट केले की त्याने ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप पाहिला होता. त्याला सांगण्यात आले होते की तो साप इतका विषारी आहे की त्याच्या दंशामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. जर्मन कर्णधाराच्या मते, सापाचे विष प्राणघातक नसले तरी ते निश्चितच धोकादायक आहे.

स्विस कॅम्पच्या परिसरात प्रवेशबंदी क्षेत्र

फिफा विश्वचषकादरम्यान सापांबद्दल चिंता व्यक्त करणारा जर्मनी हा एकमेव संघ नाही. नॉर्वे आणि स्वित्झर्लंडलाही तेथील सापांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. स्विस संघ सॅन दिएगोमध्ये थांबला आहे, जिथे सराव मैदानाजवळील एक मोठा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सापांच्या धोक्यामुळे खेळाडूंना त्या परिसरात जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हरवलेला बॉल आणायला जाण्यासही त्यांना मनाई आहे.

नॉर्वेलाही मिळाली सूचना

अर्लिंग हालंड आणि मार्टिन ओडेगार्ड यांसारखे स्टार खेळाडू असलेल्या नॉर्वेच्या संघालाही नॉर्थ कॅरोलिनामधील सापांबाबत इशारा देण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी खेळाडूंना दिसणाऱ्या कोणत्याही सापांना त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे, कारण या परिसरात अशा प्राण्यांशी सामना होणे सामान्य आहे.

जर्मन संघाने आपल्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत क्युराकाओला ७-१ ने पराभूत केले, परंतु विजयाच्या जल्लोषादरम्यान संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सापाच्या प्रवेशाने वातावरण बदलले. अमेरिकेतील असलेल्या संघाच्या ट्रेनिंग कॅम्पजवळ विषारी साप दिसल्याच्या बातमीने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची चिंता वाढली आहे.

Women’s T20 World Cup 2026: मोठा उलटफेर! श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास; नीलाक्षिका सिल्वाचा मास्टरक्लास

Web Title: Fifa world cup 2026 poisonous snakes germany training camp security concerns switzerland norway warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Germany
  • Snake Found

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.