Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Germany News : फ्रँकफर्टमध्ये हिंसाचाराचा भडका; १७ दुकानांची तोडफोड, ५ दुकानांची लूट

Germany News : जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये तरुणांच्या आंदोलनानंतर हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी १७ दुकानांची तोडफोड केली असून पाच दुकानांमध्ये लूटमार केली. संघर्षात १०० हून अधिक पोलीस जखमी झाले, तर ५४ जणांना अटक करण्यात आली. जर्मन सरकारने दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 01, 2026 | 09:46 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण
  • १०० हून अधिक पोलीस जखमी; ५४ जणांना अटक
  • जर्मन मंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा
Germany News : जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात तरुणांच्या आंदोलनानंतर हिंसाचाराचा मोठा उद्रेक झाला आहे. आंदोलकांच्या गर्दीत घुसलेल्या दंगलखोरांनी दुकानांची तोडफोड करत लूटमार केली. या घटनेत १७ दुकानांचे नुकसान झाले असून पाच दुकानांमधील वस्तू लुटण्यात आल्या. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. या हिंसाचारानंतर जर्मनीच्या सरकारने दोषींना शोधून कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे.

शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण

जर्मनीतील अनेक शहरांमध्ये तरुणांनी शिक्षण व्यवस्था सुधारावी, वाढती महागाई नियंत्रणात आणावी आणि जीवनावश्यक खर्च कमी करावा, अशा मागण्यांसाठी निदर्शने केली होती. ‘Gen Z regelt’ या मोहिमेच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते.

सुरुवातीला बहुतांश ठिकाणी आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, शनिवारी रात्री फ्रँकफर्टच्या मध्यवर्ती भागात परिस्थिती बिघडली. काही दंगलखोरांनी दुकानांच्या काचा फोडल्या, मालाची लूट केली आणि पोलिसांवर दगडफेक केली. आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचेही वृत्त आहे.

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

१०० हून अधिक पोलीस जखमी; ५४ जणांना अटक

हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हेसन राज्याचे गृहमंत्री रोमन पोसेक यांच्या माहितीनुसार, सुमारे १३०० पोलिसांना परिस्थिती हाताळण्यासाठी रस्त्यावर उतरवण्यात आले. या संघर्षात १०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ ते २९ वयोगटातील ५४ जणांना अटक करण्यात आली. हिंसाचारात सहभागी असलेल्या दंगलखोरांची संख्या १ हजार ते १ हजार ५०० दरम्यान असू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथके, पाण्याचे फवारे आणि हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.

Turkey News : चंद्रमोहीमेसाठी तुर्की सज्ज; २०२७ मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावणार पहिले स्वदेशी अंतराळयान

जर्मन मंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

फ्रँकफर्टमधील हिंसाचारानंतर जर्मनीचे केंद्रीय गृहमंत्री अलेक्झांडर डोब्रिंट यांनी संताप व्यक्त केला आहे. दुकानांची तोडफोड आणि लूटमार करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या हिंसाचाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेसनचे मुख्यमंत्री बोरिस राईन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. शांततापूर्ण आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, फ्रँकफर्टमधील बाधित व्यापाऱ्यांना मदत करण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे. या घटनेमुळे जर्मनीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Germany frankfurt violence gen z protest shop looting police arrests cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Germany
  • Marathi News
  • Protester

संबंधित बातम्या

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग
1

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
2

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून
3

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
4

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.