न्यूझीलंडच्या १५१ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. अटापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. पण त्यानंतर संघाची फलंदाजी अडखळली. त्यानंतर नीलाक्षिका आणि कविशा दिलहरी यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. ही भागीदारी तुटल्यानंतर, नीलाक्षिका आणि कौशानी नुथ्यांगना यांनी जोरदार फलंदाजी करत संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. नीलाक्षिका ३७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ५४ धावांवर नाबाद राहिली. कौशानी २४ धावांवर नाबाद राहिली, तर चमारीने २७ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून, नॅन्सी पटेलने दोन विकेट्स घेतले, तर ब्री एलिंगने एक विकेट घेतला.
Jubilant scenes in Birmingham! 🎉🇱🇰#NilakshikaSilva‘s brilliant fifty guides #SriLanka to a memorable win over the defending champions! 👏🔥 UP NEXT: ICC Women’s #T20WorldCup 2026 | #ENGvIRE | LIVE NOW 👉 https://t.co/ruxbLg3mUK pic.twitter.com/0CJdaBngCZ — Star Sports (@StarSportsIndia) June 16, 2026
न्यूझीलंडच्या इसाबेला गेज आणि जॉर्जिया प्लायमर यांनी डावाची सुरुवात केली. न्यूझीलंडची कर्णधार अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी ४५ धावा करून संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले,उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या अमेलिया केरचे अर्धशतक हुकले, तिने ३६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ४५ धावा केल्या. त्यानंतर ब्रुक हॅलिडे सात धावा करून बाद झाली. सोफी डिव्हाईननेही ३० चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅडी ग्रीन १८ धावांवर नाबाद राहिली, तर जेस केरनेही सहा धावा केल्या. संपूर्ण संघ २० षटकांत केवळ १५० धावाच करू शकला, जी धावसंख्या श्रीलंकेसाठी खूपच कमी ठरली. श्रीलंकेकडून, मिताली अयोध्याने ४ षटकांत २४ धावा देऊन १ विकेट घेतला. कविशा दिलहरीने २ विकेट्स घेतले. अटापट्टू, सुगंधिका आणि निमाशा मीपेज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतले.
श्रीलंका: चामारी अटापट्टू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, नीलाक्षीका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (यष्टीरक्षक), सुगंधिका कुमारी, काव्या कविंदी, मिताली अयोध्या, मिताली ए.
न्यूझीलंड: इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जॉर्जिया प्लायमर, अमेलिया केर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इझी शार्प, जेस केर, नॅन्सी पटेल, रोझमेरी मेयर, ब्री एलिंग.






