Finally Rohit said, I am playing and will play, I am doing what is needed for my team
Rohit Sharma : मी आऊट ऑफ फॉर्म चाललो होतो. माझ्या टीमसाठी मी आऊट ऑफ फॉर्म जास्त दिवस कॅरी नाही करू शकत. मग मी काय करायला पाहिजे ते मी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीमसाठी काय गरजेचे आहे, तर त्यासाठी मी निर्णय घेतला. मी निर्णय सिडनीला आल्यावर घेतला. परंतु हे माझ्या डोक्यात मेलबर्न टेस्टपासून चालले होते, आणि तसेच मी केले. मी खेळतोय आणि कोणताही रिटायरमेंटचा माझा विचार नाही, हे सर्व जे काही तुम्हाला दिसतेय ते माझ्या टीमसाठी मी करतोय, बाकी काही नाही, एकदम स्पष्ट, अशी मोठी गर्जना करीत रोहित शर्माने आपले क्रिकेट अजून शिल्लक असल्याची ग्वाही दिली.
हिटमॅन स्टाईल दिले उत्तर
रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर मोठा काथ्याकूट झाला, अनेक दिग्गजांनी आपआपली मते व्यक्त केली. त्याच्या खराब फॉर्मवर रिटायरमेंटच्या वार्ता चालल्या. परंतु, आज रोहित शर्माचा हिटमॅन अवतार दिसला. आणि त्याच्याच शैलीत त्याने याची उत्तरे दिली. तीही सरळ सरळ आणि स्पष्टपणे, कोणताही बडेजाव नाही, कोणताही पडदा नाही. एकदम हिटमॅन स्टाईल
आम्ही स्टीलचे बनलोय आणि खेळाडूंनासुद्धा स्टीलचे बनवतोय.
कोण काय बोलते याची पर्वा नाही
माझ्याबद्दल बाहेर काय चालले आहे याची मी पर्वा करीत नाही, बाहेरचे लोक आपल्याबद्दल काय बोलतात याची काळजी मला नसते आणि तसेच मी माझ्या खेळाडूंना सांगतो. हेही खेर आहे बाहेर काय चालते त्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. कोणीही एक एअर कंडिशन रूममध्ये बसून पेन, माईक, कागद घेऊन माझ्या भवितव्याबद्दल ठरवू शकत नाही. अखेर मीसुद्धा एवढ्या वर्षे क्रिकेट खेळतोय, कर्णधार आहे, दोन मुलांचा बाप आहे, मला तेवढा सेन्स आहे. आता मला यावर वेळ वाया घालवायचा नाही. माझा कायमच फोकस सामना जिंकण्यावर आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यावर राहिला आहे. मला टीमसाठी काय करायचे आहे ते मी करतोय आणि करणार.
सामना जि्कण्याच्या उद्देशाने कायमच मैदानात
मी 2007 पासून हाच अॅप्रोच ठेवून खेळतोय की, मला सामना जिंकायचा आहे, आणि यामध्ये अजूनही कोणताही बदल नाही. त्याचाच एक भाग आहे मी सामन्यातून दूर आहे हे एवढे स्पष्ट आहे. आणि हेच आपल्याला अन् माझ्या टीमला करायचे आहे. प्रत्येकाला मैदानात येऊन सामना जिंकायचा असतो. आपल्या सर्वांना त्या (अफवा) संपवायचा आहे. मला सांगा, इतर कोणत्या संघाने येथे दोनदा मालिका जिंकली आहे? आमच्याकडे सुवर्णसंधी आहे. आम्ही मालिका जिंकू शकत नाही पण ही मालिका ड्रॉ करू शकतो. या क्राऊडला आम्हाला शांत करायचेय आणि त्याकरिता जे करायचे ते मी करतोय. भारतीय संघाचे कर्णधाऱपद हे मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि ती तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे यासाठीच मी हे सर्व करतो. कोणालाही हे मोठे पद ताटात वाढून आले नाही. त्यामागे मेहनत आहे, माझ्याअगोदर विराट, एमएस धोनी यांनाही हे अपार कष्टानेच मिळालेय, आणि पुढील खेळाडूंनादेखील त्याच्या कर्तृत्वावर कमवावे लागणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ते एक आघाडीचा फलंदाज म्हणून रोहित शर्मा वारंवार अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याने अवघ्या 31 धावा करून त्याचा जो रुतबा आहे तो गमावल्याचे पाहायला मिळाले यामध्ये त्याने केलेला खराब परफॉर्मन्स त्याच्या कारकिर्दीला गालबोट लावणारा ठरणार आहे. यामध्ये भर म्हणून सिडनी टेस्टमध्ये त्याच्या प्लेईंग इलेव्हनवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुमराहच्या नेतृत्वात संघ खेळला तर आश्चर्य वाटायला नको इतपत परिस्थिती येऊन ठेपली आहे. अशा दिग्गज कर्णधाराला वेळीच म्हणजे न्यूझीलंड दोऱ्यातच सुधारणा करणे अपेक्षित होते, तसे जर केले असते तर त्याच्यावर एवढी नामुष्की आली नसती. पण, त्याने आज सगळ्याच गोष्टींना धडाकेबाज पद्धतीने उत्तरे दिली आणि सर्वांची तोंडे बंद केली.