Forgotten his own century King Kohli woke up after the audience gave him a standing ovation on 100 runs Watch funny VIDEO
IND vs AUS 1st Test Match : भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाला नामोहरम केले. टीम इंडियाच्या फलंदाजीत सलामीवीर यशस्वी जयस्वालची मोठी इनिंग, त्याने शानदार 161 धावा केल्या. त्यानंत केएल राहुलनेसुद्धा शानदार 77 धावांचे योगदान दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंग कोहलीने नाबाद 100 धावा ठोकल्या. यामध्ये गंमत अशी झाली की, किंग कोहलीला सुद्धा कळाले नाही की, त्याचे शतक झाले आहे.
किंग कोहली स्वतःचेच शतक विसरल्यानंतर, प्रेक्षकांनी दिली आठवण करून
किंग कोहलीची कमाल, आपलेच शतक विसरला
दुसऱ्या डावात भारतीय संघाची मोठी कमाल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार गोलंदाजी करीत कांगारूंचा 295 धावांनी पराभव करीत इतिहास रचला, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, भारतीय संघ सुद्धा पहिल्या डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला. परंतु, दुसऱ्या डावात जोरदार कमबॅक करीत मोठी धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठे आव्हान उभे केले. आणि त्यानंतर भारतीय संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंना 295 धावांनी पराभूत केले.
मोठी लीड मिळवली
रोहित शर्मा पहिल्या सामन्यातून बाहेर असताना पहिल्याच सामन्यात भारतीय संघ कोलमडून पडेल असे वाटत होते. मात्र, हे केवळ ऑस्ट्रेलियाचे स्वप्न होते, तर दुसरीकडे बुमराह वेगळ्याच गोष्टीचा विचार करत होता. त्याने भेदक गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंना पाणी पाजले. कसोटीच्या पहिल्या दिवशी कोणता संघ बाजी मारेल हे सांगता येत नव्हते. पण, बुमराहच्या टीमने करून दाखवले. पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही संघ जवळ जवळ फलंदाजीत अपयशी ठरले. त्यानंतर मात्र भारतीय संघाने शानदार फलंदाजी करीत मोठी लीड घेतली. दुसऱ्या डावात 487 धावांची मोठी खेळी केली त्यानंतर ऑस्ट्रेलिया एवढी लीड गाठण्यात अपयशी ठरले.
बुमराहची कमाल
बुमराहने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश केला होता. ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडली असली तरी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही अंतिम-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. 69 वर्षांनंतर भारतीय संघात तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. यापूर्वी 1955 मध्ये ढाका येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हे दिसून आले होते जेव्हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विजय मांजरेकर, नरेन ताम्हाणे आणि माधव मंत्री यांचा समावेश करण्यात आला होता.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच्या वादग्रस्त निर्णयाची भरपाई
भारताचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने हिरव्या रंगाच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच्या आपल्या वादग्रस्त निर्णयाची भरपाई केली आणि सुरुवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली, ज्याच्या मदतीने फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिली कसोटी जिंकली. आयपीएलच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी झालेल्या सामन्यात 67 धावांवर सात विकेट्स घेऊन पुनरागमन केले. हा सामना खराब फॉर्ममध्ये असलेल्या दोन्ही संघांच्या फलंदाजांमधील लढत मानला जात होता आणि पहिल्या दिवशी 17 विकेट्सच्या घसरणीत याचे प्रतिबिंब दिसून आले.