
vinod kambli viral video
भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, तो पाहून त्यांचे चाहते अत्यंत चिंतेत आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये कांबळी यांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट देत, ते खूप आनंदी असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी एका वृद्धाश्रमात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही कालावाधीपासून विनोद कांबळी अनेक आजारांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत ते वृद्धाश्रमात चिंतेत वाढ झाली होती. मात्र मि या ठिकाणी खुश असल्याचे कांबळी यांनी सांगितल्याने चाहत्यांची चिंता थोडी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चाहत्यांच्या वाढत्या चिंतेदरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये विनोद कांबळी स्वतः त्यांच्या तब्येतीबद्दल आणि वातावरणाबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “मी या ठिकाणी अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. येथील लोक माझी खूप चांगली काळजी घेत आहेत.” कांबळी यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्यांचे हे विधान पाहून चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Video of Vinod Kambli at elderly care home in Thane goes viral on social media amid continued health battles pic.twitter.com/tiRnaoy6v8 — Cricket Hub (@Anurag9793) September 26, 2026
भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या स्फोटक फलंदाजीने ९० चे दशक गाजवणारे माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या त्यांच्या आरोग्यामुळे चर्चेत असले, तरी क्रिकेटच्या मैदानावरील त्यांचा एक मोठा विक्रम आजही कायम आहे. भारतासाठी सर्वात जलद १,००० कसोटी धावा पूर्ण करण्याचा विनोद कांबळी यांचा विक्रम अद्याप कोणताही भारतीय फलंदाज मोडू शकलेला नाही.
एकूण सामने: १७ कसोटी सामने
एकूण धावा: १,०८४ धावा
फलंदाजीची सरासरी: ५४.२० (उत्कृष्ट सरासरी)
शतके: ४ शतके (यामध्ये सलग दोन द्विशतकांचा समावेश आहे)