Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव; अडीच कोटींच्या मानहानीचा दावा

भारतीय कोच गौतम गंभीर यांनी एआय डीपफेक आणि ओळखीच्या चोरीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला भरला आहे. यात मेटा, गुगल, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही पक्षकार केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 04:02 PM
Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव (Photo Credit- X)

Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • Gautam Gambhir आक्रमक!
  • AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव
  • अडीच कोटींच्या मानहानीचा दावा
Gautam Gambhir Deepfake Case: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि विश्वविजेते खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी आपल्या वैयक्तिक अधिकारांच्या (Personality Rights) रक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. आपल्या नावाचा, चेहऱ्याचा आणि आवाजाचा ‘एआय डीपफेक’ (AI Deepfake) द्वारे चुकीचा वापर होत असल्याप्रकरणी गंभीर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये दिवाणी खटला दाखल केला आहे. यामुळे सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत.

बनावट राजीनामा आणि व्हायरल व्हिडिओंचे प्रकरण

गौतम गंभीर यांच्या कायदेशीर पथकाने दिलेल्या माहितीनुसार, 2025 च्या अखेरीस सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बनावट कंटेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब आणि फेसबुकवरील काही अकाउंट्सनी ‘व्हॉईस क्लोनिंग’ आणि ‘फेस-स्वॅप’ तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर यांचे खोटे व्हिडिओ तयार केले.

🚨Gautam Gambhir moves Delhi High Court against deepfakes, AI misuse, and unauthorized use of his identity This is a right step by Gautam Gambhir. Not just him, all players and big personalities should take action against this. People who post fake statements in their name or… pic.twitter.com/DxaUdCeRka — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 19, 2026

यातील एका व्हिडिओमध्ये गंभीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची खोटी घोषणा केली होती, ज्याला 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी वरिष्ठ खेळाडूंवर टीका केल्याचे भासवले होते, जो 17 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. हे सर्व व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून गंभीर यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

‘Rohit – Virat ची वेळ संपली असं वाटावं तर काय चुकलं’, Gautam Gambhir ने संघात येताच काय केलं? R Ashwin चा खुलासा

टेक कंपन्या आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म रडारवर

या प्रकरणात केवळ व्हिडिओ बनवणारेच नाही, तर ते प्रसारित करणारे प्लॅटफॉर्मही गंभीर यांच्या निशाण्यावर आहेत. एकूण 16 प्रतिवादींविरुद्ध हा खटला भरण्यात आला आहे, ज्यात प्रामुख्याने खालील नावांचा समावेश आहे:

  • सोशल मीडिया: मेटा (फेसबुक/इंस्टाग्राम), एक्स कॉर्प, गुगल आणि यूट्यूब.
  • ई-कॉमर्स: ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट (विनापरवाना मर्चेंडाईज आणि पोस्टर्स विक्री केल्याप्रकरणी).
  • वैयक्तिक अकाउंट्स: जैनकी फ्रेम्स, भूपेंद्र पेंटोला, लेजेंड्स रेव्होल्यूशन यांसारख्या हँडल्सचा यात समावेश आहे.
  • सरकारी विभाग: आयटी मंत्रालय आणि दूरसंचार विभागालाही कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी पक्षकार करण्यात आले आहे.

कायदेशीर आधार आणि अडीच कोटींचा दावा

गौतम गंभीर यांनी या खटल्यात 2.5 कोटी रुपयांच्या हर्जाण्याची मागणी केली आहे. त्यांनी कॉपीराईट ॲक्ट 1957, ट्रेडमार्क ॲक्ट 1999 आणि कमर्शियल कोर्ट ॲक्ट 2015 चा आधार घेतला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्या बाबतीत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालांचा दाखला देत, आपल्या व्यक्तिमत्व अधिकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“माझी ओळख हे शस्त्र नाही”; गंभीर यांची रोखठोक भूमिका

या कायदेशीर कारवाईबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाले, “माझी ओळख, माझे नाव, चेहरा आणि आवाजाचा वापर काही लोक चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी करत आहेत. हे केवळ माझ्या वैयक्तिक नुकसानीचे प्रकरण नाही, तर एआयच्या काळात प्रत्येक सार्वजनिक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आणि कायद्याचा प्रश्न आहे. माझी ओळख कोणालाही शस्त्र म्हणून वापरू देणार नाही.” गंभीर यांनी न्यायालयाने तातडीने आदेश देऊन सर्व आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आणि भविष्यात असा वापर करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची विनंती केली आहे.

Gautam Gambhir: “भारतीय संघाचा कोच होण्यामागे KKR चा मोठा वाटा”; गौतम गंभीरने व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाला…

Web Title: Gautam gambhir aggressive moves to delhi high court against ai deepfakes and fake videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • ai
  • delhi high court
  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
2

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य
3

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.