IND Vs ENG: Gill Sena loses at Lord's, while Sara Tendulkar is seen enjoying the party; What's the real story?
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. या पराभवामुळे आता टीम इंडिया मालिकेत २-१ ने मागे पडली आहे. पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केला. परंतु, ते भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. या दरम्यान सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर मनोसोक्त फिरत असल्याचे दिसून आले आहे. तसेच ती एका पार्टीत देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल लंडनमध्ये एकत्र दिसून आले होते. युवराज सिंगकडून आयोजित करण्यात आलेल्या एका डिनर पार्टीमधील दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण, त्या पार्टीनंतर काही दिवसांनी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा सेलिब्रेशन करताना दिसून आली. यामध्ये खास गोष्ट म्हणजे सारा तेंडुलकरच्या सेलिब्रेशनचे फोटो त्याच तारखेचे आहेत ज्या दिवशी टीम इंडियाचा लॉर्ड्सवर पराभव झाला होता. आता सारा तेंडुलकर १४ जुलै रोजी नेमकं काय सेलिब्रेशन करत होती असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वप्रथम, १४ जुलै रोजी सारा तेंडुलकर या दिवशी इंग्लंडमध्ये हजर नव्हती तर ती फ्रान्समध्ये असल्याची माहिती आहे. आता फ्रान्स दरवर्षी १४ जुलै रोजी आपल्या देशात सुरू झालेली क्रांती साजरी करत असतो. ज्याला फ्रान्समध्ये ‘बॅस्टिल डे’ असे म्हणतात. सारा तेंडुलकर तिची मैत्रीण साशा जयरामसोबत तो दिवस साजरा करताना दिसून आली. फ्रान्समध्ये बॅस्टिल डे निमित्त सारा तेंडुलकरने तिच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : ..तर लॉर्ड्सवर टीम इंडियाच ठरली असती विजेती; इंग्लंडविरुद्ध या ५ चुका गिलसेनेला पडल्या महागात
यामध्ये काही फोटो हे तिची मैत्रीण साशा जयरामने देखील शेअर केले आहेत. सारा तेंडुलकरची मैत्रीण साशा जयराम ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून काम पाहते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसते. जे तिच्या इंस्टाग्रामवर पाहून लक्षात येते.