टीम इंडिया आणि इंग्लंड(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. आता इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रापर्यंत टीम इंडियाचा विजय सुकर वाटत होता. परंतु टीम इंडियाने फलंदाजीला सुरवात करताच सामना हळूहळू इंग्लंडच्या बाजूने झुकू लागला होता. हातात असणारा विजय भारताला कसा गमवावा लागाला भारतीय संघ कुठे चुकला? याबाबत आतापण माहिती करून घेऊया.
टीम इंडियाची तिसरी विकेट चौथ्या दिवशी पडली होती. तेव्हा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतऐवजी आकाश दीपला नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. आकाश दीपकडून अशी अपेक्षा करण्यात आली होती कि, तो चौथा दिवसाचा खेळ खेळून काढले. परंतु वास्तवात तसे काही झाले नाही. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आकाश दीपला बाद केले. जर त्याच्या जागी एखादा फलंदाज आला असता तर त्याने त्याची विकेट वाचवून ठेवली असती.
हेही वाचा : संसदेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक येणार.., केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती; काय असणार तरतुदी?
भारतीय कर्णधार शुभमन गिलची फलंदाजी देखील टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरली आहे. सध्या तो टीम इंडियाचा भरवाशाचा फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. त्याने एजबॅस्टन आणि लीड्स कसोटीतही आपली शानदार फलंदाजी दाखवून दिली. पण लॉर्ड्स कसोटीत मात्र त्याला धावा काढता आल्या नाहीत.त्याने या सामन्याच्या दोन्ही डाव मिळून एकूण २२ धावा केल्या.
पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात टीम इंडियाने देखील पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. खरं तर टीम इंडिया त्यांच्या पहिल्या डावात सहज ४०० पार जाऊ शकली असती. पण पहिल्या डावात भारताने शेवटचे ४ विकेट्स फक्त ११ धावांत गमावले आणि भारत ३८७ पर्यंतच पोहचू शकला.
टीम इंडियाने इंग्लिश संघाला दिलेल्या अतिरिक्त धावा हे देखील भारताच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. भारतीय संघाने दोन्ही डावात एकूण ६३ अतिरिक्त धावा दिल्या आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघाने या सामन्यात केवळ ३० धावा मोजल्या. टीम इंडियाला २२ धावांनी सामना गमवावा लागला. यामुळेच इंग्लिश संघाने हा सामना सहज आपल्या खिशात टाकला.
भारताचा सतार फलंदाज केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीत आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. परंतु, क्षेत्ररक्षण करताना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या डावात राहुलने विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथचा झेल सोडला. त्यावेळी स्मिथ फक्त ५ धावा काढून खेळत होता. त्यानंतर, त्याने ५१ धावा केल्या.
हेही वाचा : Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी
पहिल्या डावात ऋषभ पंतचे धावबाद होणे भारताच्या पराभवाचे एक कारण ठरले आहे. त्याने पहिल्या डावात ७४ धावा केल्या आणि केएल राहुलला शतक झळकावण्यास मदत करतेवेळी तो धावबाद होऊन माघारी परतला. त्याच्या जाण्याने टीम इंडियाच्या स्कोअरबोर्डचे मोठे नुकसान झाले.