सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे आता टीम इंडिया मालिकेत २-१ ने पिछाडीवर गेली आहे. पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केला. परंतु, ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले कि तो वेळ पडेल तेव्हा शानदार फलंदाजी देखील करू शकतो. त्याने दाखवलेला संयम कौतुकास पात्र होता. त्याने आपल्या टेलेंडर्सला सोबत घेऊन विजयाकडे वाटचाल केली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याची विकेट घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. परंतु, ते त्यात त्यांना यश मिळत नव्हते. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीने जडेजाला चांगली साथ दिली, परंतु ते त्यांची विकेट वाचवू शकले नाहीत आणि परिणामी इंग्लंडने सामना आपल्या खिशात टाकला. आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने लॉर्ड्स सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ..तर लॉर्ड्सवर टीम इंडियाच ठरली असती विजेती; इंग्लंडविरुद्ध या ५ चुका गिलसेनेला पडल्या महागात
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पाचव्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आपली कमाल दाखवत शानदार कामगिरी केली. टीम इंडियाला सामना गमवावा लागला तरी आता सर्वजण या तिघांचे कौतुक करताना दिसून येत आहेत. याबाबत आता माजी महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरने देखील लॉर्ड्स कसोटीवर या तिघांचे भरभरून कौतुक करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया पोस्टद्वारे लिहिले आहे की “इतके जवळ, तरीही आतापर्यंत जडेजा, बुमराह आणि सिराज यांनी शेवटपर्यंत कठोर परिश्रम केले. उत्तम प्रयत्न, टीम इंडिया. दबाव राखण्यासाठी इंग्लंडने चांगले खेळले आणि कष्टाने मिळवलेल्या विजयासाठी अभिनंदन.” अशी प्रतिक्रिया तेंडुलकरने दिली आहे.
So near, yet so far….
Jadeja, Bumrah, & Siraj fought all the way till the end. Well tried, Team India.
England played well to keep the pressure on and produced the result they desired. Congratulations on a hard fought win.— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 14, 2025
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडच्या कोणत्याही गोलंदाजाला रवींद्र जडेजाला बाद करता आले नाही. त्याने चौथ्या दिवशी शानदार फलंदाजी करताना त्याने १८१ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच वेळी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी देखील त्याला चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने ५४ चेंडू खेळून करत ५ धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने ३० चेंडूत ४ धावा केल्या. शेवटी, तो शोएब बशीरच्या चेंडूवर बाद झाला आणि इंग्लडचा विजय निश्चित झाला.
हेही वाचा : Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी