
GT Vs RCB Live Scorecard: रजत पाटीदारची खणखणीत खेळी; आरसीबी 250 पार, टायटन्सला विजयासाठी...
गुजरात टायटन्सचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
वेंकटेश अय्यरने पहिल्याच ओव्हरमध्ये लुटल्या 13 रन्स
विराट कोहलीने केली 43 रन्सची आक्रमक खेळी
Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1 Live Updates: आयपीएल 2026 मधील प्ले ऑफचे सामने सुरू झाले आहेत. आज धर्मशाळा येथे प्लेऑफमधील पहिला क्वालिफायरचा सामना खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर 1 सुरू आहे. गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर या सामन्यात आरसीबीने गुजरातला 255 रन्सचे टार्गेट दिले आहे. अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी गुजरातला 255 रन्सची गरज असणार आहे.
आरसीबीची फलंदाजी
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आरसीबीला आमंत्रित केले होते. आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यरने डावाची सुरुवात केली. वेंकटेश अय्यरने पहिल्याच ओव्हरमध्ये 13 रन्स केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात अय्यर आउट झाला. त्यानंतर विराट कोहलीची साथ देण्यासाठी देवदत्त पडीकल मैदानात आला. विराट आणि देवदत्तने चांगली भागीदारी केली. कर्णधार रजत पाटीदारने शानदार अर्धशतक लगावले. त्याच्या खेळीमुळे आरसीबीने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. कृणाल पंड्या 43 रन्सवर आउट झाला. तर टीम डेव्हिड 4 रन्स करून परतला.
RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
विराट कोहलीने शानदार सुरुवात केली. मात्र 43 रन्सवर विराट कोहलीने आपली विकेट गमावली. त्यापाठोपाठ देवदत्त पडीकलने 30 रन्सची खेळी केली. 3 विकेट गमावल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि कृणाल पंड्याने चांगली भागीदारी करत आरसीबीचा डाव सांभाळला. प्रसिद्ध कृष्णाने टीम डेव्हिडला आउट केले. तर रबाडाने कृणाल पंड्याला आउट केले.
Rapid response from @RCBTweets 👊 Virat Kohli and Devdutt Padikkal bring up a fiery 5️⃣0️⃣-run stand 🤝#RCB 76/1 after 6 overs Updates ▶️ https://t.co/9rs6u5obOw#TATAIPL | #Qualifier1 | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/pdu7Wr19Ad — IndianPremierLeague (@IPL) May 26, 2026
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि कगीसो रबाडाने चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यरला कगिसो रबाडाने आउट केले. तर जेसन होल्डरने आक्रमक खेळी करणाऱ्या विराट कोहलीला 43 रन्सवर आउट केले. त्यामुळे आरसीबीचा संघ अडचणीत आला. त्यापाठोपाठ होल्डरने देवदत्त पडीकलची विकेट घेतली.
आरसीबी संभाव्य टीम: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.
IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.