GT Vs RCB Live Streaming (फोटो- ians)
धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर गुजरात विरुद्ध आरसीबी आमनेसामने
मोहम्मद सिराज अन् भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीकडे लक्ष
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट
Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1 Live Updates: थोड्याच वेळात हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या हंगामातील प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. क्वालिफायर 1 मध्ये (IPL 2026) गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. नुकताच टॉस पार पडला. टॉस जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्मशाळाची खेळपट्टी गुजरात टायटन्ससाठी नवीन असणार आहे. 2022 नंतर गुजरातचा संघ प्रथमच या मैदानावर खेळणार आहे तर समोर जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा आरसीबीचा संघ असणार आहे. विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, वेंकटेश अय्यर, देवदत्त पाडीकल, रासीख डार, जितेश शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे.
तर दुसरीकडे गुजरात टायटन्समध्ये कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, मोहम्मद सिराज, राशीद खान, जोस बटलर हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा क्वालिफायर 1 चा सामना अत्यंत रोमांचक आणि हाय स्कोअरिंग होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी?
आज संध्याकाळी महामुकाबला होणार आहे. गुजरात आणि बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. मात्र सामना मोठा असला तरी दोन महत्वाचे खेळाडू आज खेळताना दिसणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली आज मैदानात दिसणार अहरत. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एक किंग आहे तर दुसरा खेळाडू प्रिन्स म्हणून ओळखला जातो. आजच्या सामन्यात दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
अलीकडील सामन्यांची आकडेवारी दर्शवते की येथे वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि संघांनी महत्त्वाच्या टप्प्यात फिरकीचा तुलनेने कमी वापर केला आहे. या मैदानावर नाणेफेक देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या हंगामातील तीनपैकी दोन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.
IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.






