Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs RR Qualifier 2: मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार?

GT vs RR IPL 2026 Qualifier-2Pitch Report: आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६ च्या फायनलच्या तिकिटासाठी लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कशी मुल्लानपूर स्टेडियमची खेळपट्टी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 03:30 PM
GT vs RR Qualifier 2:  मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार?
Follow Us
Follow Us:
  • मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत
  • गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग
  • खेळपट्टी कोणाला साथ देणार?
आयपीएल २०२६ स्पर्धेत आज क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. एलिमिनेटरमध्ये हैदराबादला बाहेर काढल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, पहिल्या क्वालिफायरमध्ये बंगळूरुकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर गुजरात टायटन्स जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. कशी असेल मुल्लानपूर स्टेडियमची खेळपट्टी आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

ISSF World Cup: नेम अचूक, निशाणा सुवर्णपदकावर! 25 मीटर पिस्तूल प्रकारात Esha Singh चा नवा वर्ल्ड रेकॉर्ड

जीटी विरुद्ध आरआर खेळपट्टी अहवाल

मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. आयपीएल २०२६ हंगामाच्या सुरुवातीला येथे २२० आणि २२३ धावांचे लक्ष्य सहज पार करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मैदानावर जोरदार वारे होते आणि त्यामुळे खेळपट्टी बराच वेळ झाकून ठेवण्यात आली होती. यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.

मुल्लानपूर स्टेडियममधील आयपीएल रेकॉर्ड

या स्टेडियमवर एकूण १६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ८ सामने प्रथण फलंदाजी करुन जिंकले आहेत तर ८ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने १० सामने तर नाणेफेक हरलेल्या संघाने ६ सामने जिंकले आहेत.

हेड टू हेड रेकॉर्ड

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत १० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी गुजरातने ७ सामने जिंकले असून राजस्थानने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे हेड टू हेड आकडेवारीमध्ये गुजरातचे वर्चस्व दिसून येते. मात्र, आयपीएल २०२६ हंगामात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

संभाव्य प्लेइंग ११

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.

 

Web Title: Gt vs rr qualifier 2 mullanpur pitch report playing xi ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Rajasthan Royals

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.