हरमनप्रीत कौर : आगामी T20 विश्वचषक 2024 च्या तयारीसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ ऑक्टोबरमध्ये पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी बांग्लादेशचा दौरा करत आहे. भारताचा संघाने ही पाच सामान्यांची मालिका आधीच जिंकली आहे. भारताने डकवर्थ-लुईस पद्धतीने चौथा सामना 56 धावांनी जिंकला आहे. भारताने मालिका 4-0 ने जिंकली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सिल्हेत येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरताना एक विशेष कामगिरी केली. मार्च 2009 मध्ये भारतासाठी पदार्पण करणारी हरमनप्रीत कौर 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी दुसरी भारतीय महिला आणि जगातील पाचवी खेळाडू ठरली आहे.
मिताली राज 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची पहिला महिला
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिचा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आली होती. मिताली राजसोबत 300 हून अधिक सामने खेळणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली. माजी कर्णधार मितालीने तिच्या 23 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये 333 सामने खेळले आहेत. महिला क्रिकेटमध्ये 300 हून अधिक सामन्यांमध्ये भाग घेणारी हरमनप्रीत कौर ही जगातील पाचवी खेळाडू आहे.
पदार्पण करणारी सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू
भारत विरुद्ध बांग्लादेश या सामन्यामध्ये कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग ठाकूर यांच्या जागी तितास साधू आणि आशा शोभना यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला होता. आशा शोभनाने भारतासाठी पदार्पण केले. आशा शोभना 33 वर्षे आणि 51 दिवस वयाच्या महिला T20I मध्ये पदार्पण करणारी सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेल्या महिला खेळाडू
मिताली राज : 333 सामने
सुझी बेट्स: 317 सामने
एलिस पेरी: 314 सामने
शार्लोट एडवर्ड्स: 309 सामने
हरमनप्रीत कौर : 300 सामने