Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

W W W तीन चेंडूंवर तीन विकेट्स! Hasan Mahmud ची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अशी कामगिरी करणारा बांग्लादेशचा पहिला वेगवान गोलंदाज

Hasan Mahmud first Bangladesh Bowler take Test hat-trick: बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना अबू धाबीमध्ये सुरू आहे. या सामन्यात हसन महमूदने हॅट-ट्रिक घेत इतिहास रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 05:34 PM
Hasan Mahmud

Hasan Mahmud

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षांनंतर कसोटीत हॅट्ट्रिक
  • हसन महमूदने रचला इतिहास
  • बांग्लादेशच्या क्रिकेटमध्ये सुवर्णक्षण
Hasan Mahmud Test hat-trick: बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने एक ऐतिहासिक कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेणारा तो बांग्लादेशचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

 

हसनची कारकीर्द आतापर्यंत शानदार राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. यापूर्वी अलोक कपाली आणि सोहाग गाझी यांनी बांग्लादेशसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट-ट्रिक घेतली होती. दोघेही फिरकी गोलंदाज होते. आजपर्यंत कोणत्याही वेगवान गोलंदाजाने बांग्लादेशसाठी ही कामगिरी केली नव्हती. आता हसनने या यादीत आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. (Hasan Mahmud first Bangladesh Bowler take Test hat-trick)

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

हसन महमूदची उत्कृष्ट गोलंदाजी

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने ३४६ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर सर्वबाद झाला. बांग्लादेशने पहिल्या डावात १०६ धावांची आघाडी घेतली. बांग्लादेशला एवढी मोठी आघाडी मिळवू देण्यात हससने महत्वाची भूमिका बजावली. त्याने २१ षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. कसोटी क्रिकेटमधील हसनची ही चौथी पाच विकेट्स -फिफर कामगिरी होती. त्याने दुसऱ्या नव्या चेंडूने कहर केला. हसनने इस्मत आलम, कैस अहमद आणि झिया उर रहमान यांना बाद करून हॅट-ट्रिक घेतली. हसनव्यतिरिक्त, इबादत होसेनने बांग्लादेशसाठी चार विकेट्स घेतले. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बांग्लादेश विजयाच्या जवळ पोहोचला.

अलोक कपाली आणि सोहाग गाझी यांची शानदार कामगिरी

हसन महमूदने अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाच्या ८३ व्या षटकात शानदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत आपली कसोटी हॅट-ट्रिक पूर्ण केली. हसनच्या आधी अलोक कपालीने २००३ मध्ये पेशावर येथे पाकिस्तानविरुद्ध आणि सोहाग गाझी यांनी न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. २००३ मध्ये बांग्लादेशसाठी कसोटी हॅट-ट्रिक घेणारे कपाली हे पहिले गोलंदाज होते. त्यानंतर २०१३ मध्ये सोहाग गाझी यांनी हा पराक्रम केला.

हसनने आता २०१३ नंतर हॅट-ट्रिक घेतली आहे. हसनने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. त्याने १६ कसोटी सामन्यांमध्ये ४५ विकेट्स, २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतले आहेत आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. हसन बांग्लादेशसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो.

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

Web Title: Hasan mahmud test hat trick bangladesh first fast bowler pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • Bangladesh Cricket Team
  • Test cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.