IND Vs ENG: 'He's a great opening batsman, people just don't know about him yet..', England's Moeen Ali praises KL Rahul..
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. ही मालिका २-२ अशी बरोबरी सुटली. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध केली. शुभमन गिलने नेतृत्वासोबतच आपल्या बॅट शानदार कामगिरी केली. तसेच भारताचा अनुभवी आणि भरवशाचा फलंदाज केएल राहुलने देखील भारतीय संघाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्याने मैदानात नांगर टाकून एका बाजूने कठीण समयी किल्ला लढवला. अशातच या भरवशाच्या फलंदाजाचे इंग्लंडच्या मोईन अलीने कौतुक करत म्हटले आहे की, राहुल जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली. ही मालिका बरोबरीत समाप्त होणे हे भारतीय संघापेक्षा मालिका जिंकण्यापेक्षा कमी नाही. कारण विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनसारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी संघाची साथ सोडल्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. दरम्यान गिलने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आणि मालिका बरोबरीत आणली. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक ७५४ धावा केल्या. तर जो रूटने ५३७, केएल राहुलने ५३२ धावा चोपून काढल्या. यादरम्यान त्याने ५३.२ च्या सरासरीने धावा करताना २ शतकं झळकावली.
इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या मते, केएल राहुल हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मोईन अलीने ‘बर्ड बिफोर विकेट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना केएल राहुलचे तोंडभरून कौतुक केले. मोईन अली म्हणाला, केएल राहुल हा सलामीवीर फलंदाज म्हणून किती उत्तम फलंदाज आहे, हे अजूनही लोकांना कळालेले नाही. गेल्या वेळी जेव्हा भारताचा संघ इंग्लंडमध्ये आला होता, त्यावेळी देखील त्याने दमदार कामगिरी केली होती. आता यावेळीही त्याने दमदार कामगिरी केली आहे. शुबमन गिलने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, पण मला वाटतं केएल राहुलची भूमिका अतिशय महत्वाची होती.
हेही वाचा : लॉर्ड्स ग्राउंडचा तुकडा करा खरेदी! चालून आली मोठी सुवर्णसंधी; मोजावे लागतील ‘इतके’ पैसे..
मी त्याला कित्येक वर्षांपासून खेळताना पाहतोय. तसेच तो पुढे म्हणाला की, मला तरी हेच वाटतं की तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. मी हे आधीही सांगितले आहे. केएल राहुलने इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या दौऱ्यावर त्याने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. तर गेल्यावेळी त्याने २०० हून अधिक धावा केल्या होत्या. यावेळी फलंदाजी करताना त्याने लीड् स आणि लॉई स कसोटीत दमदार शतकी खेळी केली होती. लॉई सच्या मैदानावर शतक झळकावताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली. जो लॉई सच्या मैदानावर एकाहून अधिक शतकं झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी दिलीप वेंगसरकरांनी हा कारनामा केला होता. याआधी २०२१ मध्येही त्याने लॉई सच्या मैदानावर शतक झळकावले होते.