लॉर्ड्स ग्राउंड(फोटो-सोशल मीडिया)
नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली.ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला, या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय अटीतटीचाझाला होता. भारताची परिस्थिती बिकट असताना भारतचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तळाच्या खेळाडूंना सोबत घेऊन सामना खूप रंगतदार अवस्थेत आणला परंतु जिथे भारत जिंकणार वाटत होते, तिथे बाजी पलटली आणि इंग्लंडचा विजय झाला. लॉर्ड्स हे मैदान अशा अनेक गाजलेल्या सामन्यांचे साक्षीदार राहिले आहे. लॉर्ड्स हे क्रिकेटचा मक्का म्हणून देखील ओळखले जाते. अशातच आता या यामैदानातील गवताचा तुकडे खरेदी करण्याची संधी चाहत्यांसाठी चालून आली आहे.नेमकं हे प्रकरण काय आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.
क्रिकेटच्या जगात, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाला ऐतिहासिक असे महत्व आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी या ऐतिहासिक मैदानाच्या एका भागाचे नाव देण्याची एक अनोखी संधी चालून आली असून लॉर्ड्स क्रिकेट मैदान चालवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची खेळपट्टी पुन्हा तयार करण्यात येणार आहे. यासाठी, मैदानातील सध्याचे गवत काढून नवीन गवत पेरले जाणार आहे. अशा परिस्थितीत, मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ने एक अनोखा उपक्रमास सुरवात केली आहे. ते या मैदानातील गवताचे तुकडे फक्त ५० पौंड (सुमारे ५००० रुपये) मध्ये विक्रीस ठेवणार आहेत.
हेही वाचा :
या निर्णयामागील कारण असे आहे की, एमसीसी फाउंडेशनसाठी निधी उभारणे आणि मैदानाच्या सुविधांमध्ये अधिकच्या सुधारणा करणे हे आहे. विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी १०% रक्कम एमसीसी फाउंडेशनला जाणार आहे. जी क्रिकेटच्या विकासासाठी काम करण्यासाठी कार्यरत असते. तर उर्वरित रक्कम मैदानाच्या देखभालीसाठी वापरली जाणार आहे.
एमसीसीकडून त्यांच्या २५,००० सदस्यांना कळवण्यात आले आहे की ते १.२ x ०.६ मीटर टर्फचे तुकडे खरेदी करू शकतात. ही ऑफर केवळ क्लब सदस्यांसाठीच नाही तर सामान्य क्रिकेट चाहत्यांसाठी देखील खुली असणार आहे. तथापि, हे तुकडे मर्यादित प्रमाणात उपलब्ध राहणार असून २९ किंवा ३० सप्टेंबर २०२५ रोजी लॉर्ड्समधून वैयक्तिकरित्या घ्यावे लागतील. असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर अनेक संस्मरणीय असे सामने खेळले गेले आहेत. यातील अनेक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे असे होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अलिकडच्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच वेळी, २०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना देखील या मैदानावर खेळवण्यात आला होता.