
"No one can take away my destiny...", says Gill for the first time since being dropped from the T20 World Cup 2026 squad
Shubman Gill’s comments about the T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी-२० विश्वचषकाला काही दिसव शिल्लक आहे. सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने काही आठवड्यापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला वगळले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच गिलने आपले मौन सोडले आहे. रविवार (११ जानेवारी २०२६) पासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, गिल म्हणाला की तो निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि स्पर्धेत संघाला शुभेच्छा देतो.
हेही वाचा : कुंडलीतच क्रिकेट कारकिर्द लिहिलेली! भारतीय खेळाडू वैष्णवीच्या वडिलांनी केली होती भविष्यवाणी; वाचा सविस्तर
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना गिल म्हणाला की, “मी निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. मी संघाला टी-२० विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो.” तसेच तो पुढे म्हणाला की, “मी जिथे असायला हवे तिथेच आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते कोणी देखील हिरावून घेऊ शकत नाही. खेळाडू नेहमीच देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची इच्छा ठेवतो आणि निवडकर्त्यांना त्यांचे काम करावे लागते.”
गिल पुढे म्हणाला की, “आम्ही न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळलो होतो तेव्हा मी माझा पदार्पण केला होता आणि तो दिवस मी नेहमीच जपत आहे.” तो पुढे असे देखील म्हणाला की, “कोणत्याही स्वरूपाला गृहीत धरता कामा नये. जर तुम्ही पाहिले तर, २०११ पासून भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला नाही. म्हणून, कोणतेही स्वरूप सोपे नाही आणि त्यासाठी खूप कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय हा आवश्यक आहे.”
भारतीय कर्णधार पुढे म्हणतो की, “सामना चुकवणे आणि संघाचा खेळ पाहणे हे सोपे नसते. कर्णधार म्हणून, खूप काही करायचे असते. तसेच तुम्हाला गती निर्माण करावी लागेल आणि त्यावर भर द्यावा लागेल.”
मागील वर्षी, २०२५ मध्ये, कर्णधार, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात गिलवर विश्वास दाखवत फॉर्ममध्ये असणाऱ्या फलंदाज संजू सॅमसनला दुर्लक्षित करून त्याला नेहमीच संधी दिली गेली. तथापि, त्याला संधीचे सोने करता आले नाही. गेल्या वर्षी, त्याने भारतीय संघासाठी एकूण १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, मात्र त्याला या दरम्यान त्याने २४.२५ च्या सरासरीने आणि १३७.२६ च्या स्ट्राईक रेटने त्याला फक्त २१९ धावाच करता आल्या.