Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs RR Head to Head: एलिमिनेटरमध्ये सनराझर्स भिडणार राजस्थान रॉयल्सशी, कोणाचा पगडा भारी? काय सांगतात रेकॉर्ड्स

आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. २०२३ च्या हंगामापासून राजस्थानने हैदराबादला पराभूत केलेले नाही. त्यामुळे हा सामना खूपच चुरशीचा ठरणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2026 | 10:03 AM
SRH vs RR कोण मारणार बाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

SRH vs RR कोण मारणार बाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबादचा रंगणार सामना
  • २०२३ पासून सनराझर्स राजस्थानविरूद्ध सामना हरलेले नाहीत 
  • वैभव सूर्यवंशी विरूद्ध अभिषेक शर्मा कोण मारणार बाजी? 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे आणि आयपीएल २०२६ चा एलिमिनेटर सामना आज खेळला जाईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंत अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आहेत मात्र प्रत्येक वेळी सनराझर्सने बाजी मारली आहे. 

या सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्यावर असणार आहे. संपूर्ण हंगामात या दोघांनीही आपल्या बॅटने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि आता एलिमिनेटरमध्ये नक्की कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. २००८ नंतर राजस्थान रॉयल्सने एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे सध्या त्यांचं स्वप्नं हे ट्रॉफी जिंकणं हेच आहे आणि यावर्षी सनरायझर्स हैदराबादची टीमही तगडी टक्कर देत आहे. त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे यामध्ये कोणाचंही दुमत नसेल.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत २३ सामने खेळले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबादने १४ सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने नऊ सामने जिंकले आहेत. हैदराबादने या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानला पराभूत केले आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबादने ५-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना कठीण झाला आहे. राजस्थानने हैदराबादला शेवटचे २०२३ च्या हंगामात पराभूत केले होते.

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर

प्लेऑफमध्ये दोनदा आमनेसामने

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल प्लेऑफमध्येही सामना झाला आहे. २०२४ हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला. त्यापूर्वी, २०१३ मध्ये हे दोन संघ एका एलिमिनेटर सामन्यातही खेळले होते. त्या सामन्यात राजस्थानने हैदराबादला ४ गडी राखून पराभूत केले होते.

या हंगामातील राजस्थान आणि हैदराबादची कामगिरी

राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ ची सुरुवात जोरदार केली आणि आपले पहिले चार सामने जिंकले. त्यानंतर, त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. ५ व्या ते १२ व्या सामन्यांदरम्यान संघाला केवळ दोन विजय मिळवता आले. तथापि, शेवटचे दोन सामने जिंकून त्यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये तीन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर, राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी सलग ५ विजयांची मालिका सुरू केली. तेव्हापासून, संघाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत.

IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Web Title: Head to head eliminator match sunrisers hyderabad vs rajasthan royals previous stats in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.