Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khashaba Jadhav: देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना मिळणार पद्मविभूषण? HC चे महत्त्वपूर्ण निर्देश

HC On Khashaba Jadhav Padmavibhushan : स्वतंत्र्य भारताचे पहिले ऑलिपिकपटू खाशाबा जाधव यांना पद्धविभूषण पुरस्कार देण्याबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 03:31 PM
High Court on India First Olympic Medalist Khashaba Jadhav Padma Vibhushan

High Court on India First Olympic Medalist Khashaba Jadhav Padma Vibhushan

Follow Us
Follow Us:

Khashaba Jadhav Padmavibhushan : भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा योग्य सन्मान होण्याची शक्यता आहे. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला या संदर्भात ४ मे पर्यंत अंतिम निर्णय देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने काय म्हटले

१५ एप्रिल रोजी दिलेल्या आपल्या आदेशात, न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने अधोरेखित केले की, महाराष्ट्राचे रहिवासी असलेले महान कुस्तीपटू खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते होते, यावर कोणताही वाद नाही. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘कुश्तिवीर खाशाबा जाधव फाऊंडेशन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.

हे देखील वाचा : ‘माझ्या देशासाठी….’, भारत आणि ऑस्ट्रेलियाला Rashid Khan ने दाखवला ठेंगा, नागरिकत्व नाकारले

खशाबा जाधव यांच्या कुटुंबाचा दीर्घ लढा

या याचिकेद्वारे गृह मंत्रालयाच्या पद्म पुरस्कार कक्षाला, खाशाबा जाधव यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण प्रदान करण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांनी केंद्र सरकारकडे वारंवार अर्ज केला आहे, परंतु कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना न्यायव्यवस्थेकडे जाण्यास भाग पडले आहे.

खशाबा दादासाहेब जाधव कोण होते?

खशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक खेळांमध्ये कुस्तीत (बँटमवेट गट) कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते. यापूर्वी भारताने फक्त हॉकीमध्ये (एक सांघिक खेळ) पदके जिंकली होती.

हे देखील वाचा : मॅचनंतर नेमके काय घडलं? ओक्साबोक्शी रडला Vaibhav Sooryavanshi, धावत आले सहखेळाडू

खशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्रातील कराड येथे झाला. त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. १९८४ मध्ये एका रस्ते अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांना २००१ मध्ये मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, परंतु क्रीडाप्रेमींच्या मते त्यांच्या कामगिरीला पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा होता.

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी निश्चित केली आहे. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयावर लागले आहे की, भारताच्या या ‘पॉकेट डायनमो’ला तो सन्मान मिळणार की नाही, ज्याची तो सात दशकांपासून वाट पाहत आहे.

Web Title: High court on india first olympic medalist khashaba jadhav padma vibhushan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • High court
  • Olympic Medalist
  • Sports News

संबंधित बातम्या

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग
1

Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग

वेदांश, रावी, शौर्य अन् इराचा दणका! पीएमडीटीए ब्राँझ सिरीज Tennis स्पर्धेत पटकावले विजेतेपद…
2

वेदांश, रावी, शौर्य अन् इराचा दणका! पीएमडीटीए ब्राँझ सिरीज Tennis स्पर्धेत पटकावले विजेतेपद…

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम
3

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

22 वर्ष जुन्या वादाचा शेवट! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटूला न्यायालयाने ठरवले निर्दोष
4

22 वर्ष जुन्या वादाचा शेवट! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटूला न्यायालयाने ठरवले निर्दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.