वैभव सूर्यवंशीचा रडताना व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ मागून चित्रित केला आहे, ज्यात ०३ क्रमांकाची जर्सी घातलेला वैभव निराश होऊन बसलेला आहे. कधी तो आपला चेहरा लपवण्यासाठी टोपी काढतो, तर कधी आपले अश्रू पुसतो. त्याचवेळी, कोलकाता नाईट रायडर्स संघातील त्याचा एक सहकारी येतो आणि त्याचे सांत्वन करतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून, तो माणूस कदाचित वैभवला सांगत आहे की जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. १६-सेकंदांचा व्हिडिओ १.२५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता.
KKR vs RR: वैभव सूर्यवंशी कोणता रेकॉर्ड तोडणार? 15 वर्षाच्या या खेळाडूची नजर इतिहास रचण्यावर
वैभव सूर्यवंशीचे आणखी एक अर्धशतक हुकले
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांच्यामुळे पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. वैभवने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या. सूर्यवंशीने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर दोन आणि वैभव अरोराच्या गोलंदाजीवर तीन चौकार मारले. त्याने सुनील नरेन आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्या गोलंदाजीवरही षटकार मारले. त्यानंतर रहाणेने चेंडू चक्रवर्तीकडे सोपवला आणि त्याच्याच पहिल्याच षटकात सूर्यवंशीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो रमणदीप सिंगच्या हाती झेलबाद झाला आणि त्याचा डाव संपला.
केकेआरला सात सामन्यांनंतर पहिला विजय
नाइट रायडर्सने सात सामन्यांनंतर आपला पहिला विजय नोंदवत तीन गुणांसह गुणतालिकेत नववे स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्या पराभवानंतर, रॉयल्स संघ सहा सामन्यांतून आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, १४ व्या षटकात ८५ धावांत सहा गडी गमावल्यामुळे नाईट रायडर्स संघ अडचणीत सापडला होता, परंतु रिंकू (३४ चेंडूंत ५३ नाबाद, पाच चौकार, दोन षटकार) आणि अनुकूल रॉय (१६ चेंडूंत २९ नाबाद, दोन षटकार, एक चौकार) यांच्यात सातव्या विकेटसाठी ३७ चेंडूंत झालेल्या नाबाद ७६ धावांच्या भागीदारीमुळे, त्यांनी १९.४ षटकांत सहा गडी गमावून १६१ धावा करत विजय नोंदवला.
राजस्थान रॉयल्सचे 1.10 कोटी वसूल! वैभव सूर्यवंशीने फक्त 17 चेंडूत झळकावले पहिले अर्धशतक






