Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi Records: वय अवघे 15 तोडले 7 मोठे रेकॉर्ड्स, सर्वात जलद 50, 100 आणि 150; टाका एक नजर

वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अनेक विक्रम रचले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPL या दोन्हीमध्ये आपली छाप पाडली आहे. त्याच्या रेकॉर्ड्सची आकडेवारी एकदा पाहूया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 22, 2026 | 02:16 PM
वैभव सूर्यवंशीच्या नावे असणारे ७ रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीच्या नावे असणारे ७ रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभवची डोंगराइतकी कामगिरी 
  • ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले 
  • वैभव सूर्यवंशीची आतापर्यंतची आकडेवारी वाचा 
अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहे. त्याने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून लिस्ट ‘A’ क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे. तो लिस्ट ‘A’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पण करण्यापूर्वीच वैभवने कोणते विक्रम प्रस्थापित केले आहेत, ते आज आपण जाणून घेऊया 

सर्वात जलद अर्धशतक

भारत ‘अ’ संघाकडून खेळताना, वैभव सूर्यवंशीने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभव आता लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. वैभवने श्रीलंकेचा फलंदाज कौशल्या वीरारत्नेचा विक्रम मोडला, ज्याने १२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

Vaibhav Sooryavanshi: ‘तो आला, भांडला, मारले आणि जाळून टाकले’, वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेत दबदबा, चाहता कॅमेऱ्यासमोरच….

सर्वात तरुण शतकवीर

वैभव सूर्यवंशी हा लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. त्याने हा विक्रम वयाच्या १४ वर्षे आणि २७२ दिवसांत केला आहे. त्याने बिहारकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफीमध्ये ही कामगिरी केली. या सामन्यात वैभवने १९० धावांची दमदार खेळी केली.

सर्वात जलद १५० धावांचा विक्रम

वैभव सूर्यवंशी हा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करणारा फलंदाज आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. वैभवने अवघ्या ५९ चेंडूंमध्ये आपल्या १५० धावा पूर्ण केल्या.

तिसऱ्या सर्वात जलद शतकाचा विक्रम

या १५ वर्षीय फलंदाजाच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसऱ्या सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. विजय हजारे स्पर्धेत बिहारकडून खेळताना वैभवने अवघ्या ३६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये वैभवपेक्षा जलद शतके करणारे इतर फलंदाज म्हणजे इशान किशन (३३ चेंडू) आणि अनमोलप्रीत (३५ चेंडू).

युवा कसोटीतील सर्वात वेगवान शतक

युवा कसोटीत भारतासाठी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना, त्याने ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्ध अवघ्या ५८ चेंडूंमध्ये शतक झळकावले. हे १९ वर्षांखालील क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक देखील आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू

वैभव सूर्यवंशी हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने वयाच्या १२ वर्षे आणि २८४ दिवसांनी या स्पर्धेत पदार्पण केले.

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

युवा एकदिवसीय/विश्वचषकातील शानदार खेळी

वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील विश्वचषकात हा पराक्रम केला. इंडियन प्रीमियर लीग कपच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची धडाकेबाज खेळी केली, जी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे. वैभव जर असेच खेळत राहिला तर काही वर्षांनी त्याच्या नावावर होणारे विक्रम हे नक्कीच आश्चर्यकारक असतील आणि ते मोडणंंही कठीण होईल. 

Web Title: Vaibhav sooryavanshi 7 big records smashed at the age of 15 from fastest 50 100 and 150 know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • cricket news
  • Sports News
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…
1

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय
2

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
3

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार
4

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.