‘हिंदवी वॉरीयर्स करंडक’ वरिष्ठ महिला क्रिकेट (फोटो- सोशल मिडिया)
पहिल्यांदा खेळणाऱ्या गॅरी कर्स्टन ॲकॅडमीचा डाव २५.२ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला. तनुजा वायबसे (नाबाद ३३ धावा) आणि राजनंदीनी (२२ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. एलिट संघाच्या शुभ्रा चव्हाण हिने तीन गडी तर, अवनी पाटील हिने दोन गडी बाद केले. एलिट ॲकॅडमीने १९.२ षटकात हे लक्ष्य गाठले. आराध्या पवार हिने ५३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने अवनी पाटील हिने २० धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
स्वरा शेंदूरकर हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ओम साई क्लबने रिक्रीएशन क्लबचा ५५ धावांनी पराभव करून विजयी सुरूवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ओम साई क्लबने ४४.२ षटकात २१० धावा धावफलकावर लावल्या. सेहज कौर (४८ धावा), मानसी तिवारी (४२ धावा), मृदला आचार्य (३८ धावा) आणि तेजस्वीनी मोरे (२८ धावा) यांनी धावा जमवून संघाचा डाव उभा केला. रिक्रीएशनच्या स्वरा देशपांडे हिने चार गडी बाद केले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना रिक्रीएशन क्लबचा डाव ३६.१ षटकात १५५ धावांवर संपुष्टात आला. श्रृती गिते (४५ धावा), श्रीया तिकोणे (३९ धावा) आणि अक्क्षरा परदेशी (२१ धावा) यांनी धावा जमवून प्रतिकार केला. ओम साई संघाच्या स्वरा शेंदूरकर हिने १९ धावांत निम्मा संघ तंबुत पाठवला. दिव्या मेरगळ आणि आर्या वर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला सहज विजय मिळवून दिला. याआधी स्पर्धेचे उद्घाटन वॉरीयर्स स्पोर्ट्सचे संस्थापक युवराज शेवाळे, प्रतिक्षा शेवाळे आणि स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.
गॅरी कर्स्टन ॲकॅडमी : २५.२ षटकात १० गडी बाद १०७ धावा (तनुजा वायबसे नाबाद ३३, राजनंदीनी २२, अनन्या चव्हाण १९, शुभ्रा चव्हाण ३-२२, अवनी पाटील २-१६) पराभूत वि. एलिट ॲकॅडमीः १९.२ षटकात ३ गडी बाद १०८ धावा (आराध्या पवार ६० (५३, ७ चौकार, १ षटकार), अवनी पाटील २०, ओवी वरदकर १-२९); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः आराध्या पवार
पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
ओम साई क्लब : ४४.२ षटकात १० गडी बाद २१० धावा (सेहज कौर ४८, मानसी तिवारी ४२, मृदला आचार्य ३८, तेजस्वीनी मोरे २८, स्वरा देशपांडे ४-४५, सानिका लोकरे २-२९, श्रृती गिते २-३२) वि.वि. रिक्रीएशन क्लबः ३६.१ षटकात १० गडी बाद १५५ धावा (श्रृती गिते ४५, श्रीया तिकोणे ३९, अक्क्षरा परदेशी २१, स्वरा शेंदूरकर ५-१९, दिव्या मेरगळ २-९, आर्या वर्मा २-२२); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वरा शेंदूरकर.






