Satara Zilla Parishad School SMC Reorganization
Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शिकेनुसार जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची पुनर्रचना नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली.
दुसरीकडे, शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात (२०२६) पहिल्यांदाच ४०० गुणांचा टप्पा पार करत सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक आणि घटकांचे विरकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळातही साताऱ्याचा शैक्षणिक आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास अध्यक्ष विशाल विरकर यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच जिल्ह्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
डांबरी लेअरअभावी रस्ता बनला मृत्यूचा सापळा; मखमलाबाद शिव ते यशवंतनगर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच
Ans: सातारा जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
Ans: जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये पुनर्गठन पूर्ण झाले.
Ans: सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.






