‘स्पार्टन मान्सून लीग’ (फोटो- सोशल मिडिया)
पुण्याच्या सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अजिंक्य जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने कॅप क्रुसेडर्सचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने १५८ धावांचे आव्हान उभे केले. दर्शन एम. याने २१, तर मानस कुमारने ३० धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली.
Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
लेजंड्सकडून फर्श अन्सारी आणि अजिंक्य जैन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.विजयासाठीचे १५९ धावांचे लक्ष्य लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने १४.३ षटकांत आठ गडी गमावून पूर्ण केले. अजिंक्य जैनने ४५ धावा, निखील भुजबळने ३३ धावा, तर सचिन भोसलेने २६ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात वैभव लवांडेच्या तडाखेबाज ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने कॅप क्रुसेडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने २११ धावांचे मोठे आव्हान उभे केले. शाम बिष्णोईने ४२ धावा, प्रद्युम्न त्यागीने नाबाद ३२ धावा, दर्शन एम. याने ३३ धावा, तर शुभम एस. याने ३१ धावा करत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला.
ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने हे आव्हान १७.३ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. वैभव लवांडेने अवघ्या ३६ चेंडूंत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याला नेल्सन अरीकने ४२ धावा, तर अभिषेक परांगेने ३६ धावा करत चांगली साथ दिली. या कामगिरीच्या जोरावर ब्रेव्हहार्टने सहज विजय मिळवत स्पर्धेतील पाचवा विजय नोंदविला.






