
जय शाह यांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य - Instagram)
क्रिकेटचे सामने कॅलिफोर्नियातील पोमोना येथील फेअरप्लेक्स स्टेडियमवर खेळले जातील. या स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले असून, त्याची एकूण क्षमता १०,००० असेल. या ठिकाणी पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा खेळल्या जातील आणि प्रत्येक स्पर्धेत एकूण सहा देश सहभागी होतील. हे ठिकाण मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मधील लॉस एंजेलिस नाइट रायडर्स संघाचे घरचे मैदानदेखील आहे.
IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी
काय म्हणाले जय शाह
ठिकाणाबाबत घोषणा करताना आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे की क्रिकेटला अखेरीस जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे. शाह यांनी सांगितले की, क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि जागतिक स्तरावर त्याचे एक विशेष स्थान निर्माण करणे हे आयसीसीचे ध्येय राहिले आहे, आणि ऑलिम्पिक चळवळीचा भाग असणे ही अभिमानाची बाब असून त्यासोबत अनेक स्वप्नेही जोडलेली आहेत. शाह यांनी आशा व्यक्त केली की, हे मैदान अमेरिकेतील क्रिकेटवर एक चिरस्थायी ठसा उमटवेल.”
कधी खेळला होता सामना
शेवटचा क्रिकेट सामना १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला होता. त्यावेळी, क्रिकेट स्पर्धेत केवळ ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सने भाग घेतला होता. यावेळी, पुरुष आणि महिला असे एकूण सहा संघ प्रत्येक स्पर्धेत सहभागी होतील. २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमधील क्रिकेट सामने टी-२० स्वरूपात खेळले जातील. लॉस एंजेलिसपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पोमोना येथे असलेले हे मैदान १२ जुलै ते २९ जुलै दरम्यान ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करेल.
दरम्यान आता प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली असेल की, यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड होणार आणि भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये कशा पद्धतीने आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार. अजूनही यासाठी दोन वर्ष आहेत. पण त्याची तयारी नक्कीच आतापासून होणार असेल यात काही शंका नाही. आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीचे खेळ पाहता दोन वर्षात त्यांना नक्कीच यासाठी संधी मिळू शकते असाही कयास लावला जात आहे.