Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू एलिस पेरीने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकून सातव्यांदा विश्वचषक पटकावला. ही पेरीची नववी आयसीसी ट्रॉफी होती.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 10:16 AM
एलिस पेरीचा अनोखा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

एलिस पेरीचा अनोखा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियन खेळाडू एलिस पेरीच्या नावे अनोखा रेकॉर्ड 
  • ९ वेळा जिंकली आयसीसी ट्रॉफी
  • इंग्लंडविरूद्ध ऑस्ट्रेलियाने मिळवला किताब 
ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला क्रिकेटपटू, एलिस पेरीने एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे जो कदाचित कधीही मोडला जाणार नाही. नऊ आयसीसी ट्रॉफी जिंकणारी पेरी ही जगातील एकमेव पुरुष आणि महिला क्रिकेटपटू ठरली आहे. २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पेरीने हा पराक्रम केला.

एलिस पेरीने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. पेरीच्या पदार्पणापासून, ऑस्ट्रेलियाने सात टी-२० विश्वचषक आणि दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. यापैकी नऊ आयसीसी विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा पेरी एक भाग होती. इतकेच नाही, तर पेरीने आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट कामगिरीही केली आहे. आतापर्यंत असा रेकॉर्ड कोणीही केला नाहीये. एलिस पेरीसाठी ही नक्कीच मानाची बाब आहे. 

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद

एलिस पेरीने जिंकलेल्या सर्व नऊ आयसीसी ट्रॉफींची यादी

क्रमांक वर्ष टूर्नामेंट यजमान देश विरोधी टीम
1 2010 ICC महिला टी20 वर्ल्ड कप वेस्टइंडीज न्यूझीलंड
2 2012 ICC महिला टी20 वर्ल्ड कप श्रीलंका इंग्लंड
3 2013 ICC महिला वनडे वर्ल्ड कप भारत वेस्टइंडीज
4 2014 ICC महिला टी20 वर्ल्ड कप बांग्लादेश इंग्लंड
5 2018 ICC महिला टी20 वर्ल्ड कप वेस्टइंडीज इंग्लंड
6 2020 ICC महिला टी20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया भारत
7 2022 ICC महिला वनडे वर्ल्ड कप न्यूझीलंड इंग्लंड
8 2023 ICC महिला टी20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
9 2026 ICC महिला टी20 वर्ल्ड कप इंग्लंड / वेल्स इंग्लंड

ENG W vs AUS W Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये चालली इंग्लिश कर्णधाराची बॅट, इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५१ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरीची कारकीर्द

ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरीची कारकीर्द प्रभावी राहिली आहे. तिने ऑस्ट्रेलियासाठी १५ कसोटी, १६८ एकदिवसीय आणि १८१ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तिने १,००६ धावा केल्या असून ३९ बळी घेतले आहेत. तिच्या नावावर दोन शतके आणि पाच अर्धशतके आहेत.

याव्यतिरिक्त, पेरीने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,५८१ धावा केल्या असून त्यात तीन शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना पेरीने १६६ बळीही घेतले आहेत. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीसोबतच, तिची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दही दमदार राहिली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पेरीने २,४९५ धावा केल्या असून १३१ बळी घेतले आहेत.

Web Title: History made by australian player ellyse perry won 9 icc trophies in cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • cricket news
  • ICC Women's T20 World Cup

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
3

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर
4

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.