लॉर्ड्सच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही फायदेशीर ठरु शकते. टी-२० क्रिकेटमध्ये संघ सहसा प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देत असले तरी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय दबावाच्या अंतिम सामन्यात फायदेशीर ठरू शकतो. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात, ऑस्ट्रेलियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध १७१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.
ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाने ९ पैकी ६ वेळा महिला टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सातव्यांदा विश्वविजेता बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ पाच वेळा महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु त्यांना केवळ एकदाच विजेतेपद मिळवता आले आहे. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंड संघाने आपला झेंडा फडकवला होता आणि विश्वविजेता बनला होता. यावेळी परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल ठरू शकते, कारण विश्वचषक त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे.
इंग्लंड: एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया कॅम्प, डॅनियल गिब्सन, शार्लट डीन, लिन्से स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया: जॉर्जिया वॉल, बेथ मूनी (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅशले गार्डनर, जॉर्जिया वॉरहॅम, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मॉलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.






