Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Cricket: गटसाखळी फेरीमध्ये रायझिंग स्टार ब्ल्यु संघ (२ विजय, १ पराभव, ०.५२५ धावगती) आणि रायझिंग स्टार रेड संघ (२ विजय, १ पराभव, ०.५१७ धावगती) अशी कामगिरी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 04:52 PM
Pune Cricket League Tournament

Pune Cricket League Tournament

Follow Us
Follow Us:
  • रायझिंग स्टार ब्ल्यु संघाला विजेतेपद 
  • ‌‘रायझिंग स्टार करंडक‌’ प्रौढ गटाची टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा 
  • धीरज कुमार याने फटकावल्या ८० रन्स 
पुणे/Cricket: रायझिंग स्टार स्पोर्ट्‌‍स तर्फे आयोजित ‌‘रायझिंग स्टार करंडक‌’ प्रौढ गटाच्या (५० वर्षावरील) टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार रेड संघापेक्षा उत्तम सरासरी धावगती राखत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेत (Pune) धीरज कुमार याने फटकावलेल्या ८० धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार यलो संघाचा ४१ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळणाऱ्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. धीरज कुमार याने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. निलेश सामंत याने ३८ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग स्टार यलो संघाचा डाव १५० धावांवर मर्यादित राहीला.

दुसऱ्या सामन्यात गुरूप्रसाद स्वामी याने केलेल्या ७९ धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ऑरेंज संघाने रायझिंग स्टार रेड संघाचा पराभव केला. रायझिंग स्टार ऑरेंज संघाने १७९ धावा धावफलकावर लावल्या. गुरूप्रसाद स्वामी याने ४३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. याला उत्तर देताना रायझिंग स्टार रेड संघाचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहीला. विश्वजीत नायक (२२ धावा) आणि संदीप भुर्के (२१ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

अव्वल सरासरी धावसंख्येच्या जोरावर विजेतेपदावर कोरले नाव

गटसाखळी फेरीमध्ये रायझिंग स्टार ब्ल्यु संघ (२ विजय, १ पराभव, ०.५२५ धावगती) आणि रायझिंग स्टार रेड संघ (२ विजय, १ पराभव, ०.५१७ धावगती) अशी कामगिरी केली होती. अव्वल सरासरी धावसंख्येच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मॅकमन कन्व्हेइंग अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमन जीत पंकज यांच्या हस्ते करण्यात आले. यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संयोजक आणि संचालक सतिश सराफ, अजय सैनीस आणि नितीन सामल यांसह सहभागी संघांचे खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाला करंडक आणि ५२ हजार रूपयांचे पारितोषिक तर, उपविजेत्या रायझिंग स्टार रेड संघाला करंडक आणि २६ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी

रायझिंग स्टार ब्ल्युः २० ष टकात ५ गडी बाद १९१ धावा (धीरज कुमार ८० (५१, ८ चौकार, ५ षटकार), निलेश सामंत ३८, ललित कुमार २-२१) वि.वि. रायझिंग स्टार यलोः २० षटकात ९ गडी बाद १५० धावा (समीर मुखर्जी २५, राजेश इति २०, गोविंद सनल ३-१०, निशांत नायर २-३२, राजीब मुखर्जी २-१५); सामनावीरः धीरज कुमार; रायझिंग स्टार ऑरेंजः २० षटकात ९ गडी बाद १७९ धावा (गुरूप्रसाद स्वामी ७९ (४३, ९ चौकार, ४ षटकार), राजेश तांदल ३०, मौनांग पटेल ३-४१, दिपक जोशी १-१५) वि.वि. रायझिंग स्टार रेडः २० षटकात ७ गडी बाद १४६ धावा (विश्वजीत नायक २२, संदीप भुर्के २१, दिपक आचार्य १६, नाना म्हात्रे १६, विजय नवले नाबाद २१, भुषण देशपांडे २-२१, राजशेखर रेड्डी २-३१); सामनावीरः गुरूप्रसाद स्वामी.

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Web Title: Dhrreaj kumar 80 runs and rising star blue team wins circket tournament tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
1

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
2

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
3

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
4

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.