फोटो सौजन्य - BCCI
विश्वचषकात यशस्वी कर्णधार : भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या भारताच्या संघाला विश्वचषक जिंकून दिला. त्याचे जगभरामध्ये क्रिकेट चाहत्यांकडून आणि दिग्गजांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. रोहित शर्माने या विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध ४१ चेंडूंमध्ये ९२ धावा करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. एवढेच नव्हे तर त्याने T-२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचबरोबर भारताने जिंकलेला २००७ च्या विश्वचषकामध्ये सुद्धा तो सहभागी होता. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंनी दोनदा भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे.
भारताचा अनुभवी खेळाडू किंग कोहलीने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आणि सांगितले की T-२० फॉरमॅटमध्ये त्याचा हा शेवटचा सामना आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील सामना झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली हा त्याचा शेवटचा सामना आहे. या गोष्टीसाठी क्रिकेट चाहते नक्कीच तयार नव्हते. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये दुःखाचे वादळ आले आहे. एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. परंतु फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या संघाने कधी आणि कोणत्या कर्णधारानी विश्वकप जिंकून दिला आहे. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
भारताच्या संघाची विश्वचषकातील कामगिरीकडे एकदा नजर टाकली तर, भारताच्या संघ आतापर्यत चार वेळा विश्वविजेता झाला आहे. यामध्ये भारत पहिल्यांदा विश्वविजेता १९८३ मध्ये झाला होता. यावेळी भारताचे कर्णधार कपिल देव होते. त्यानंतर टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये विश्वविजेता झाला होता. तर T-२० वर्ल्डकप मध्ये २००७ मध्ये पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता झाला होता. T-२० विश्वचषकाचा भारताचा १३ वर्षांचा दुष्काळ भारताचा कर्णधार रोहित शर्माने नष्ट केला.