Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC  रँकिंगमध्ये साधली  हॅटट्रिक

भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक क्रिकेट विश्वात चांगलेच वर्चस्व राखून आहे. त्याचे कारण भारतीय संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी हे आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 06:47 PM
The year 2025 has proven fantastic for 'RO-KO'! The Indian team is making its mark in world cricket; achieving a hat-trick in the ICC rankings.

The year 2025 has proven fantastic for 'RO-KO'! The Indian team is making its mark in world cricket; achieving a hat-trick in the ICC rankings.

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli-Rohit Sharma in 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा जागतिक क्रिकेट विश्वात चांगलाच दबदबा राखून आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत, व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले स्थान अधिक बळकट केले. कारण, दशकांच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच भारतीय संघ हॅटट्रिकसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा : Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये पठ्ठ्याने घडवला इतिहास! ध्रुव शौरीने लगावले सर्वाधिक लागोपाठ शतके

२०२३ विश्वचषक उपविजेता संघ

२०२३ च्या विश्वचषकचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला होता. या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पचवावा लागला. तथापि, वर्षभर उत्कृष्ट क्रिकेटमुळे, भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर  राहिला आहे.

रोहित-विराटची शानदार कामगिरी

गेल्या तीन वर्षांत, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी शानदार राहिली आहे. खरं तर, २०१० पासून विराट कोहली आणि रोहित शर्मा सातत्याने भारताचे अव्वल क्रमांकाचे फलंदाज राहिले आहेत. २०१० ते २०२५ पर्यंत अव्वल क्रमांकाचे भारतीय फलंदाजांच्या यादीबबद्दल जाणून घेऊया.

२०१०-२०२५ पर्यंत अव्वल क्रमांकाचे भारतीय फलंदाज

  1. विराट कोहली – १२ वेळा
  2. रोहित शर्मा – २ वेळा
  3. एमएस धोनी – १ वेळा
  4. शुभमन गिल – १ वेळा

२०२३-२०२५ पर्यंत विराट कोहलीच बॉस

२००८ ते २००५ पर्यंतच्या जवळजवळ दीड दशकांच्या कारकिर्दी दरम्यान, विराट कोहलीने आपल्या प्रभावी आणि सातत्यपूर्वक कामगिरीने ३०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्चस्व राखले. या दरम्यान खेळलेल्या ३०८ सामन्यांमध्ये त्याने १४,५५७ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये विक्रमी ५३ शतके आणि ७६ अर्धशतकांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत, जेव्हा भारतीय संघ वर्षाच्या अखेरीस गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला होता, तेव्हा विराटने या तीन वर्षांत ४३ सामन्यांमध्ये ६५ पेक्षा जास्त सरासरीने २०८६ धावा फटकावल्या होत्या. या दरम्यान त्याने ९ शतके ठोकली होती.  २०१७ आणि २०१८ मध्ये, विराटने जगभरातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची किमया साधली होती. त्याने २०१७ मध्ये १४६० धावा आणि २०१५ मध्ये १२०२ धावा काढल्या होत्या.

हेही वाचा : Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर

२०२३-२०२५ पर्यंत रोहित शर्माची खास जादू

मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगलाच प्रभाव दिसून आला. गेल्या तीन वर्षांत त्याची फलंदाजी अधिकच खुलून दिसत आहे. २००७ ते २०२५ या दीड दशकाच्या कारकीर्दीमध्ये, रोहित शर्माने २७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.२१ च्या सरासरीने ११५१६ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३३ शतके झळकवली आहेत.  गेल्या तीन वर्षांत, २०२३ ते २०२५ पर्यंत, रोहित शर्माने ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१.५५ च्या सरासरीने २०६२ धावा काढल्या असून ज्यामध्ये त्याने चार शतके ठोकली आहेत. २०२५ च्या अखेरीस, तो अखेर आयसीसी क्रमवारीत नंबर १ क्रमांकाचा खेळाडू बनला आहे तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होता.

Web Title: In 2025 the performances of rohit and virat proved beneficial for the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
1

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Angkrish Raghuvanshi Injury: विजय हजारे ट्रॉफीत ‘हिटमॅन’च्या साथीदाराला गंभीर दुखापत, स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात दाखल
2

Angkrish Raghuvanshi Injury: विजय हजारे ट्रॉफीत ‘हिटमॅन’च्या साथीदाराला गंभीर दुखापत, स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात दाखल

Rohit Sharma ला गोल्डन डकवर आऊट करणार कोण आहे देवेंद्र सिंग बोरा? यापूर्वीही केली होती अशी कामगिरी
3

Rohit Sharma ला गोल्डन डकवर आऊट करणार कोण आहे देवेंद्र सिंग बोरा? यापूर्वीही केली होती अशी कामगिरी

शतकापासून हूकला ‘किंग’ कोहली…स्फोटक फलंदाजीने वेधले लक्ष! दिल्लीसाठीच्या त्याच्या ‘शेवटच्या’ सामन्यात केल्या इतक्या धावा
4

शतकापासून हूकला ‘किंग’ कोहली…स्फोटक फलंदाजीने वेधले लक्ष! दिल्लीसाठीच्या त्याच्या ‘शेवटच्या’ सामन्यात केल्या इतक्या धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.