Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?

hockey india new orange jersey for hockey wc controversy: हॉकी इंडियाने पुरुष आणि महिला विश्वचषकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या नवीन भगव्या जर्सीचे अनावरण केले आहे. यावर माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने यावर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 02:17 PM
वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद
  • माजी कर्णधाराचा संताप
  • नेमकं प्रकरण काय?
भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आगामी पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषकांच्या पार्श्वभूमीवर, हॉकी इंडियाने संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सीचे अनावरण केले आहे. भारताचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, भारतीय हॉकीची ओळख बनलेला निळा रंग बदलण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता हॉकी इंडियाने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक

हा सगळा वाद नेमका काय ?

भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ अनेक दशकांपासून निळ्या जर्सीमध्ये खेळत आहेत. हा रंग भारतीय हॉकीची ओळख बनला आहे. नवीन भगवी जर्सी सादर झाल्यानंतर, माजी कर्णधार विरेन रासकिन्हाने सोशल मीडियावर लिहिले की, ‘हॉकी इंडियाने भारतासाठी अनेक चांगली कामे केली आहेत, पण ही गोष्ट लाजिरवाणी आहे. भारतीय संघाचा वारसा आणि ओळख नेहमीच निळी जर्सी राहिली आहे. मी अनेक वर्षे अभिमानाने निळी जर्सी परिधान केली आहे. चाहत्यांनाही भारतीय संघाला निळ्या जर्सीमध्ये पाहायचे आहे. भगव्या रंगामागे काय तर्क आहे?’ विरेन पुढे म्हणाला की, माझा साधा आणि नम्र प्रश्न फक्त भारतीय हॉकीची ओळख, अभिमान आणि वारशाबद्दल आहे.’

I must say that @TheHockeyIndia has done many good things for 🇮🇳 🏑. But this is embarrassing. The legacy & identity of the Indian team has always been BLUE. I wore the Blue jersey with pride for many years. Fans want to see our Indian team in blue. What is the logic of orange? https://t.co/apDnJkTld4 — Viren Rasquinha (@virenrasquinha) July 29, 2026

हॉकी इंडियाने यावर दिली प्रतिक्रिया

संपूर्ण वाद वाढल्यानंतर, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा बदल एका व्यक्तीचा निर्णय नव्हता, तर खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सूचनांवर आधारित होता. तिर्की यांनी सांगतले की, ‘असे निदर्शनास आले की, आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या निळ्या सिंथेटिक टर्फमध्ये निळ्या जर्सी उठून दिसत नव्हत्या. यामुळे खेळाडूंना मैदानावर एकमेकांना ओळखणे कठीण होत होते आणि व्हिजिबिलिटीमध्ये समस्या निर्माण होत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून प्रशिक्षक आणि खेळाडूंनी पिवळा आणि भगवा रंग सुचवला. सर्व बाबींचा विचार करून भगव्या रंगाची निवड करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भगवा हा आपल्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांपैकी एक आहे, जो शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि तांत्रिक आणि इतर गरजा लक्षात घेऊन भारतीय संघाच्या जर्सीचा रंग वेळोवेळी बदलण्यात आला आहे. हॉकी इंडियाने पूर्वीची उदाहरणे देत स्पष्ट केले की, भारतीय संघाने यापूर्वी विश्वचषकांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या जर्सी परिधान केल्या आहेत.

 विश्वचषक कधी ?

पुरुष हॉकी विश्वचषक १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये खेळला जाईल. भारताला इंग्लंड, वेल्स आणि पाकिस्तानसोबत ‘ड’ गटात स्थान देण्यात आले आहे. महिला हॉकी विश्वचषक १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित केला जाईल. भारतीय महिला संघ १६ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडशी होईल.

विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास

Web Title: Hockey india new orange jersey for world cup controversy viren rasquinha questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Indian hockey team
  • Indian Men's Hockey Team
  • Orange Cap

संबंधित बातम्या

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई
1

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.