क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी
आरसीबी ३०० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा हा पहिला आयपीएल संघ ठरला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ब्लूस्टोन, बोल्ट व्हेंचर्स, आदित्य बिर्ला ग्रुप आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त गटाने आरसीबीला अंदाजे १.७८ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १७,००० कोटीच्या मूल्यांकनावर विकत घेतले. जी आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघासाठी आतापर्यंत दिलेली सर्वाधिक किंमत आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्सला अंदाजे १५,७५० कोटी रुपयांच्या प्रचंड किमतीला विकत घेण्यात आले.
अहवालानुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे एकूण व्यावसायिक मूल्य वार्षिक ११.४ टक्क्यांनी वाढून २०.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. आयपीएलने सलग दुसऱ्या वर्षी दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे. लीगचे स्वतंत्र ब्रँड मूल्य देखील १०.३ टक्क्यांनी वाढून ४.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. २०२३ पासून आयपीएलच्या ब्रँड मूल्यात १.१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत मुंबई, केकेआर आणि चेन्नई हे संघही पहिल्या चारमध्ये आहेत . मुंबई इंडियन्स २५२० (264 million USD) कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर असून, त्याखाली कोलकाता नाइट रायडर्स २३३९ (245 million USD) कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्स २३३० कोटी (244 million USD) रुपयांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
लीगमधील इतर संघांच्या ब्रँड मूल्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद अंदाजे १,६०४ ( 168 million USD) कोटी सह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स अंदाजे १,५३७ (161 million USD) कोटी रुपये, पंजाब किंग्स अंदाजे १,५०८ ( 158 million USD) कोटी रुपये, गुजरात टायटन्स अंदाजे १,४९९ (157 million USD) कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स १,४८९ ( 156 million USD) कोटी रुपये आणि लखनौ सुपर जायंट्स अंदाजे १,१६४ ( 122 million USD) कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
रिपोर्टमध्ये जिओस्टारच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, आयपीएल २०२६ चा हंगाम १.०६ अब्ज स्क्रीन्सपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण प्रेक्षकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ झाली. कनेक्टेड टीव्ही हा सर्वात वेगाने वाढणारा प्लॅटफॉर्म होता, ज्याच्या पोहोचमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली. परंतु, पारंपरिक टीव्हीच्या रेटिंगमध्ये १८.८ टक्क्यांनी घट झाली.






