Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडिया WTC फायनल कशी पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

टीम इंडिया 2023-25 ​​सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 02, 2024 | 09:57 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल : सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यामध्ये भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी टीम इंडियाला काही सामने जिंकणे अनिवार्य आहे. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आतापर्यंत, टीम इंडिया 2023-25 ​​सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किती सामने जिंकावे लागतील आणि कोणत्या परिस्थितीत टीम इंडियाला इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

कोणत्याही अडथळ्याशिवाय अंतिम फेरी गाठण्यासाठी

स्टार स्पोर्ट्सद्वारे जारी केलेल्या समीकरणानुसार, जर भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे इतर संघांवर अवलंबून न राहता स्थान मिळवायचे असेल, तर 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने सामने जिंकणे आवश्यक आहे. या परिस्थितीत टीम इंडिया थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे.

इतर संघांवर अवलंबून राहण्याची स्थिती

भारतीय क्रिकेट संघाने जर सुरु असलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे मालिका 3-1 किंवा 3-2 ने जिंकली तर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकासारख्या संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडक 2-2 असा ड्रॉ केला तरीही त्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

भारताच्या संघाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी

आत्तापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन आवृत्त्याचे आयोजन आयसीसीने केले आहे. दोन्ही वेळा टीम इंडियाने फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, टीम इंडियाने आतापर्यंत एकही फायनल जिंकलेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. टीम इंडिया दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर दुसऱ्या कसोटीवर आहे, कारण आता भारताच्या प्लेइंग ११ मध्ये देखील बदल होणार आहेत त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: How will team india reach the wtc final learn the complete equation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 09:57 AM

Topics:  

  • cricket
  • India Vs Australia

संबंधित बातम्या

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
1

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
2

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ
4

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.