भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे दोन दिवसीय सराव सामना खेळत आहे. त्याला पंतप्रधान इलेव्हनकडून स्पर्धा होत आहे. पावसामुळे शनिवारी (३० नोव्हेंबर) पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. रविवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामान्यांच्या काही खास छायाचित्रणावर एकदा नजर टाका.
भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन सामना - फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडिया 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. अशा परिस्थितीत हा सराव सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यातून कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले. मुलाच्या जन्मामुळे तो पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
पंतप्रधान इलेव्हन संघ 43.2 षटकात 240 धावांवर सर्वबाद झाला. त्यासाठी 19 वर्षीय फलंदाज सॅम कॉन्स्टासने 107 धावा केल्या. भारताकडून हर्षित राणाने सर्वाधिक ४ बळी घेतले. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सराव सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली यामध्ये हर्षित राणाने चार विकेट, सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २ तर वॉशिंग्टन, जडेजा आणि प्रसिद्ध यांनी एक विकेट नावावर केला आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबर रोजी रंगणार आहे, यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया