Champions Trophy: ICC announces 'Team of the Tournament' for Champions Trophy; Rohit Sharma will miss out, while 'this' player will lead the team
Champions Trophy : टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावे केले. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या अर्धशतकाचे मोठे योगदान आहे. तसेच, भारतीय फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्युझीलंडवर मात करत चषकावर आपलं नाव कोरलं. या विजयाने टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच, आता आयसीसीकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम ऑफ दी टूर्नामेंट’ जाहीर करण्यात आली आहे. यात मात्र यशस्वी कर्णधार रोहित शर्माचे नाव नसल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
आयसीसीकडून चॅम्पियन ट्रॉफीसाठी ‘टीम ऑफ टूर्नामेंट’ जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या या संघात एकूण 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या 15 खेळांडूमध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माला या 15 खेळाडूंच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे.
रचिन रविंद्र (न्युझीलंड), विराट कोहली (भारत), केएल राहुल (भारत), श्रेयस अय्यर (भारत), इब्राहीम झरदान (अफगाणिस्तान), अझमतुल्लाह ओमराझी (अफगाणिस्तान), ग्लेन फिलिप्स (न्युझीलंड), मिचेल सँटनर (न्युझीलंड -कर्णधार), मोहोम्मद शमी (भारत), मॅट हेन्री (न्युझीलंड), अक्षर पटेल (भारत), वरुण चक्रवर्ती (भारत)या 12 खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्युझीलंडला पराभूत केले आहे. या विजयानंतर भारताच्या खेळाडूंना बक्षीस म्हणून कोट्यवधी रुपये मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Viral Video : मिस्ट्री गर्लसोबत युजवेंद्र चहल दिसताच विवेक ओबेरॉयने विचारला ‘हा’ प्रश्न, त्याने उत्तर देताच पिकला हशा…
दरम्यान, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे या संघाला विजयी बक्षीस म्हणून साधारण 19.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उपविजेता न्युझीलंड संघाला 9.78 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच सेमीफायनल संघात पराभूत झालेल्या संघाला एकूण 4.89 कोटी रुपये मिळाले आहेत.
भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. या विजयाने भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.