Champion Trophy 2025 :नागपुरात होळीआधीच 'विजयी' रंगांची बरसात; चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'असा'ही एक विजयोत्सव.. (फोटो-सोशल मीडिया)
नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात (दि. 9 मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान दिले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. या विजयाने सपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. असेच वातावरण नागपूरमध्येही बघायाला मिळाले आहे. यावेळी कॉफी हाऊस चौकाऐवजी लक्ष्मी भवन चौक भारताच्या विजयोत्सवाचे ठिकाण बनले. विजयासह शहरातील तरुण मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज घेऊन लक्ष्मी भवन चौकाकडे निघाले होते. काही वेळातच येथे मोठा जनसमुदाय जमा झाला आणि संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’, ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणांनी दुमदुमून गेल्याचे दिसले.
अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या तडाखेबाज खेळीने विजयात महत्त्वाची भूमिका बजावलीअ आहे. या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही पातळीवर भारताची कामगिरी चांगली झाली आहे. विजयासह तरुणांनी आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांवरून धरमपेठेकडे येण्यास सुरुवात केली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कॅफी हाऊस चौकात तरुणांची गर्दी जमू दिली नाही. अशा स्थितीत सर्वजण लक्ष्मी भवन चौकात जमले. इथे गाड्यांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या डीजे गाण्यांवर नाच-गाणी सुरू होती. त्यावर तरुणाई थीरकत होती.
अशा स्थितीत सर्वजण लक्ष्मी भवन चौकात जमले. इथे गाड्यांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या डीजे गाण्यांवर नाच-गाणी सुरू होती. काही वेळातच फटाक्यांचा आवाज आणि डाळिंबांच्या रोषणाईने उत्सव अधिकच रंगलेला दिसून आला. काही वेळातच तिथे हजारो लोक जमा झाले होते. तसेच शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, गार्डन रेस्टॉरंटमध्ये मोठ्या स्क्रीनवर ग्राहकांना सामना दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भारताच्या शानदार विजयासोबत येथे उपस्थित क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विजयानंतर काही वेळातच फटाक्यांचा आवाज आणि डाळिंबांच्या रोषणाईने उत्सव अधिकच रंगला. काही वेळातच येथे हजारो लोक जमा झाले. दुसरीकडे शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, गार्डन रेस्टॉरंटमध्ये मोठ्या स्क्रीनवर ग्राहकांना सामना दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आधीच सज्जता ठेवली होती. सामाजिक सलोखा राखण्यासाठी कोणत्याही आक्षेपार्ह घोषणांना परवानगी देण्यात आली नव्हती. लोकांना एकाच ठिकाणी जास्त वेळ उभे राहू दिले नाही. मात्र, यामुळे क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषात कोणताही फरक पडल्याचे दिसले नाही.