
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2027
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे की, स्पर्धेच्या तिकिटांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांच्या आतच जगभरातून १.५ कोटींहून अधिक तिकिटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी तब्बल १४२ वेगवेगळ्या देशांमधून क्रिकेटप्रेमींनी अर्ज केले आहेत. मोजक्याच दिवसांत मिळालेल्या या अफाट प्रतिसादाने मागील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अर्जांना आणि चाहत्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी आयसीसीने अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक तिकीट सिस्टिम सुरू केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता पूर्ण व्हेरीफीकेशन करूनच तिकीट दिले जाणार आहे.
ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप 2027 साठी तिकिटांसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2026 असणार आहे. त्यामुळे 21 तारखेनंतर तुम्हाला नोंदणी करता येणार नाहीये. पुढील वर्षी 21 नोव्हेंबर 2027 रोजी आयसीसीचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
प्लेइंग इलेव्हनबाबत विचार करता रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांची जागा पक्की आहे. तसेच बॅकअपच्या रुपात यशस्वी जयस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो.वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीत चौथ्या क्रमांकावरील जागा निश्चित केली आहे. या फलंदाजी क्रमवारीत श्रेयसचा दांडगा अनुभव आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी व हार्दिक पंड्या या दोघांनी विश्वचषक पथकातील आपली जागा पक्की केली आहे. तसेच फिरकीपटूंच्या रुपात रविंद्र जडेजा विश्वचषक खेळू शकतो. वॉशिंग्टन सुंदरला बॅकअप अष्टपैलूच्या रुपात आफ्रिकेसाठी संघात जागा मिळेल.
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
Ans: 2 ऑक्टोबर 2027 पासून आयसीसी पुरुष वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे.
Ans: 21 नोव्हेंबर 2027 रोजी आयसीसी वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.