Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’वर आयसीसीची मोठी जबाबदारी, जय शाहकडून सौरव गांगुलीला पुन्हा पसंती.. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार ज्याला दादा म्हणून देखील ओळखले जाते, अशा सौरव गांगुलीची आयसीसीकडून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीने सौरव गांगुलीची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 14, 2025 | 01:14 PM
Sourav Ganguly: ICC's big responsibility on the 'Dada' of Indian cricket, Jay Shah again prefers Sourav Ganguly..

Sourav Ganguly: ICC's big responsibility on the 'Dada' of Indian cricket, Jay Shah again prefers Sourav Ganguly..

Follow Us
Close
Follow Us:

Sourav Ganguly : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता एका कारणाने चर्चेत आला आहे. आयसीसीकडून भारतीय क्रिकेटच्या दादावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीने भाराताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी भारतीय फलंदाज आणि त्याचा सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची देखील समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. आयसीसीकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.

गांगुलीने २००० ते २००५ पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. २०२१ मध्ये त्यांना पहिल्यांदाच या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर त्याने अनिल कुंबळेची जागा घेतली होती. अनिल कुंबळे यांनी तीन वेळा हे पद भूषवले आहे. अनिल कुंबळे एकूण ९ वर्षे त्या समितीवर राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी हे पद सोडले. नियमानुसार आयसीसीमध्ये कोणत्याही पदावर फक्त तीन वेळा राहू शकतो.

हेही वाचा : IPL २०२५ : ‘यॉर्कर किंग’ बुमराहची धुलाई अन् राग अनावर, फलंदाजासोबत असभ्य कृत्य, रोहितने लुटला आनंद..,पहा व्हिडिओ

‘या’ खेळाडूंचा देखील समावेश

गांगुली आणि लक्ष्मण यांच्याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानचा माजी खेळाडू हमीद हसन, वेस्ट इंडिजचा महान फलंदाज डेसमंड हेन्स, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार टेम्बा बावुमा आणि इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

महिला क्रिकेट समितीचीही स्थापना.

आयसीसीकडून महिला क्रिकेटसाठी एक नवीन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडची माजी ऑफस्पिनर कॅथरीन कॅम्पबेल यांना अध्यक्षपद बनवण्यात आले आहे. तिच्यासोबत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू एव्हरिल फाहे आणि क्रिकेट साउथ आफ्रिकेचे (सीएसए) फोलेत्सी मोसेकी असणार आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : RCB च्या ड्रेसिंग रूममध्ये चोरी, Virat Kohli ची खास वस्तु चोरीला, अखेर चोर पकडला.., पहा व्हिडिओ

सौरव गांगुलीची क्रिकेट  कारकीर्द

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द यशस्वी राहिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश  आहे. गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत ४८८ डावांमध्ये ४१.४६ च्या सरासरीने १८,५७५ धावा केल्याआहेत. ज्यामध्ये  ३८ शतके आणि १०७ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ५२.५३ च्या सरासरीने ३२ विकेट्स आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.४९ च्या सरासरीने १०० विकेट्स घेतल्या आहेत. गांगुली हा एक यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार म्हणून देखील ओळखला जातो. त्याने ४९ पैकी २१ कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.

Web Title: Icc has entrusted a big responsibility to former indian cricket captain sourav ganguly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Jay shah
  • Sourav Ganguly

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
3

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
4

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.