फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठी सर्व क्रिकेट चाहते त्याचबरोबर संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे परंतु भारताचा संघ काही कारणांमुळे न जाऊ शकल्यामुळे स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारताचे सर्व सामने युएईमध्ये होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२४ चा पुरुष एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाच्या एकही खेळाडूला या संघात स्थान मिळवण्यात यश आलेले नाही. याशिवाय संघाची कमान श्रीलंकेच्या चारिथ असालंकाकडे सोपवण्यात आली आहे. या संघात तीन देशांतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपले स्थान निर्माण केले आहे.
Australian Open 2025 : नोव्हाक जोकोविचने टेनिसला केला अलविदा, उपांत्य फेरीत झाली दुखापत
अफगाणिस्तानच्या ३, पाकिस्तानच्या ३, श्रीलंकेच्या ४ आणि वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला २०२४ सालच्या पुरुष एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे. श्रीलंकेच्या चारिथ असालंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर पाकिस्तानकडून सॅम अयुब, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांना संधी मिळाली आहे. रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई आणि गझनफर यांना अफगाणिस्तानकडून संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिजच्या शेरफेन रदरफोर्डचा समावेश करण्यात आला आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांसारख्या संघातील कोणत्याही खेळाडूला २०२४ च्या आयसीसी पुरुष वनडे संघात संधी मिळालेली नाही. टीम इंडियाने २०२४ मध्ये फक्त एकच एकदिवसीय मालिका खेळली. भारताने श्रीलंकेसोबत ही मालिका खेळली होती, ज्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Presenting the ICC Men’s ODI Team of the Year 2024 featuring the finest players from around the world 👏 pic.twitter.com/ic4BSXlXCc
— ICC (@ICC) January 24, 2025
चारिथ असलंका (कर्णधार), कुशल मेंडिस, पथुम निसांका, वानिंदू हसर्गा, सॅम अयुब, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, रहमानउल्ला गुरबाज, अजमातुल्ला उमरझाई, गझनफर, शेरफान रदरफोर्ड.
भारताच्या संघाने मागील काही मालिकांमध्ये त्याचबरोबर सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या हाती एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये निराशा हाती लागली आहे. भारताच्या संघाने T२० मध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. सध्या भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध T२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. यामध्ये भारताने केलेल्या कामगिरीमुळे चाहते निराश होते आता टीम इंडियाकडे भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.