फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नोव्हाक जोकोविचने निवृत्तीची घोषणा : १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. ७२ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटनंतर त्याची दुखापत आणखीनच वाढली आणि त्यामुळे तो पुढे सामना खेळू शकला नाही. पहिल्या फेरीत टायब्रेकरवर पोहोचल्यानंतर सामना बरोबरीत सुटला, शेवटी अलेक्झांडर झ्वेरेव्हने टायब्रेकर ७-५ ने जिंकला आणि नोव्हाक जोकोविच ताबडतोब चेअर अंपायरकडे गेला आणि त्याने सामन्यातून निवृत्ती घेण्याचा दुःखद निर्णय घेतला. यासह अलेक्झांडर झ्वेरेव २०२५ ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला, जे रविवारी, २६ जानेवारी रोजी होणार आहे.
नोव्हाक जोकोविच हा जगातला एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. त्याने त्याच्या देशासाठी त्याचबरोबर खेळासाठी सर्वस्व दिले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर, माजी जागतिक नंबर-१ आणि २४ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने निवृत्तीची घोषणा केली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर अनुभवी खेळाडूला दुखापत झाली, त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. जोकोविचच्या अचानक निवृत्तीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तो आपले २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या अगदी जवळ होता, परंतु उपांत्यपूर्व फेरीपासून तो दुखापतीशी झुंजत होता. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधून उपांत्य फेरीतच माघार घेण्याचा निर्णय घेतला. जोकोविच उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सरावासाठीही आला नव्हता, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीबाबत अटकळ वाढली होती.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली. यामध्ये तो म्हणाला की, “मला माहीत नाही. नुकतेच जे घडले त्यामुळे आम्ही दोघेही निराश झालो, त्यामुळे आम्ही भविष्यातील पावले बद्दल बोललो नाही. मला वाटतं आम्हा दोघांनी थोडं चॅट करू.
Novak Djokovic was asked if he will continue working with Andy Murray as his coach:
“I don’t know. We both were disappointed with what just happened, so we didn’t talk about future steps. I think we both need to cool off a bit & then we’ll have a chat.”
— The Tennis Letter (@TheTennisLetter) January 24, 2025
उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झाला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचला ७-६ असा पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधून उपांत्य फेरीच्या मध्यातच माघार घेण्याचा निर्णय घेतला. जोकोविचच्या माघारीनंतर अलेक्झांडर झ्वेरेव ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.