सौजन्य - Cricbuzz ICC Rankings Pakistan's Shaheen Afridi Becomes World's Number-1 Bowler in ODI
Shaheen Afridi World Number One in ICC ODI Rankings : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने आयसीसी जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. जगातील एक नंबरचा गोलंदाज शाहीन अफ्रिदी ठरला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये शाहीन अफ्रिदी अव्वल नंबरचा गोलंदाज ठरला आहे. ODI मधील गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. आता पाकिस्तानची शाहीन आफ्रिदी ही जगातील नंबर 1 गोलंदाज बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. ताज्या ICC क्रमवारीत शाहीन वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
पाकिस्तानच्या गोलंदाजाची कमाल, आयसीस रॅंकींगमध्ये गाठले अव्वल स्थान
Pakistan's star pacer reclaims No. 1 position in the ICC Men's ODI Bowling Rankings 🤩https://t.co/hQnUEyAaD0
— ICC (@ICC) November 13, 2024
वनडे मालिकेत शानदार गोलंदाजी
शाहीन आफ्रिदीने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानने ही मालिका २-१ ने जिंकली. 22 वर्षांनंतर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयात शाहीन आफ्रिदीचीही महत्त्वाची भूमिका होती. या विजयासह वैयक्तिक विक्रमांमध्ये शाहीन अफ्रिदीने शानदार यश मिळवत, आयसीसी रॅंकींगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
शाहीन अफ्रिदीची पहिल्या क्रमांकावर झेप
ICC ने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग आता 696 वर पोहोचले आहे, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान ६८७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शाहीन आफ्रिदी हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शाहीनने तीन सामन्यांत १२.६२ च्या सरासरीने आठ विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत हरिस रौफने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.
बुमराहला न खेळता झाला फायदा
ICC च्या ताज्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहलाही फायदा झाला आहे. मात्र, तो बराच काळ एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बुमराह न खेळता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजनेही ताज्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. त्यानेही दोन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ॲडम झम्पा आणि जोश हेझलवूड पडले मागे
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झम्पा आणि जोश हेझलवूड यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ॲडम झाम्पा चौथ्या स्थानावरून 9व्या स्थानावर घसरला आहे. जोश हेझलवूड तीन स्थानांनी घसरून 10व्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा : कुटुंबासाठी क्रिकेट सोडले; त्यानंतर रणजीमध्ये जोरदार पुनरागमन; यशस्वी जयस्वालच्या भावाची संघर्षकथा
हेही वाचा : VIDEO : KL राहुल पर्थ कसोटीत करणार ओपनिंग; टीम इंडियाच्या सरावाने उघडले रहस्य! ‘ही’ कारणेही आहेत विशेष