
ind vs sl
कोलंबो येथे भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्या आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे आयसीसीने त्याला अधिकृतपणे समज दिली असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंटही जोडला आहे.
🔴ICC ACTION AGAINST PRABATH JAYASURIYA 🤯 – Sri Lanka star Prabath Jayasuriya has been officially warned by the ICC after his emotional outburst during the 2nd Test vs India. 😳 – He was found guilty of abusing cricket equipment after striking the boundary wedges with his bat… pic.twitter.com/CcgbWOJyht — Sam (@cricsam02) August 25, 2026
IND vs SL: रागात फेकले ग्लव्स, ड्रेसिंग रूममध्ये घातला गोंधळ! आऊट दिल्यावर अंपायरवर भडकला जयसूर्या
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याच्या दुसरी दिवशी श्रीलंकेचा खेळाडू प्रभात जयसूर्या खेळण्यासाठी आला होता. भारताचा गोलंदाज मानव सुथारने त्याला एलबीडब्ल्यू केले. अंपायरने देखील त्याला आउट ठरवले. डीआरएस घेतल्यावर देखील निर्णय तोच राहिल्याचे तो नाराज झाल्याचे दिसून आले. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने रागाच्या भरात आपली बॅट बाउंड्रीवर असलेल्या कुशनवर आदळली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यावर आता आयसीसीने गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.
Nightwatchman sent packing! 🚶➡️ Manav Suthar strikes to pick up the wicket of Prabath Jayasuriya and wrap up the day on a high! 💥 Watch #SLvIND, 2nd Test, Day 3, Tomorrow, 9 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/pAKsoOncyK — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 24, 2026
आयसीसीने नियम क्रमांक 2.2 नुसार प्रभात जयसूर्याला दोषी धरले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रीडा साहित्य, गणवेश किंवा मैदानावरील उपकरणांचे नुकसान करण्याशी संबंधित आहे.जयसूर्याने आपला गुन्हा कबूल केला असून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील जयसूर्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली नाहीये. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर आपसात भिडल्यामुळे भारताचा यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा असिथा फर्नांडो यांच्यावरही सामना शुल्काच्या २५% दंड आणि १ डिमेरिट पॉईंटची कारवाई करण्यात आली आहे.