ICC Test batsmen rankings: Joe Root again at the top, Indian players fall in the rankings...
ICC Test batsmen rankings : आयसीसीकडून आज म्हणजेच बुधवारी कसोटी फलंदाजांजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. लॉर्ड्सवर शानदार शतकी खेळी करणारा इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपला जगातील नंबर-१ फलंदाजाचा ताज पटकावला आहे. रूटने लॉर्ड्सवर झळकावलेले शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३७ वे शतक ठरले आहे. ज्यामुळे तो क्रमवारीत अव्वल स्थानावर पुन्हा विराजमान झाला आहे.
हेही वाचा : Ind W vs Eng W : टी-२० मालिका विजयानंतर भारताचा एकदिवसीय मालिकेवर डोळा; इंग्लंड विरुद्ध आज पहिला सामना
इंग्लडचा दिग्गज फलंदाज जो रूटने त्याचा संघ सहकारी हॅरी ब्रुकला मागे टाकत अव्वल स्थान पुन्हा काबीज केले आहे. लॉर्ड्स येथे खेळवण्यात आलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील डावानंतर ब्रूकने दोन स्थानांची घसरण झाली आहे. तो आता तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. यासह, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला देखील क्रमवारीतक चांगला फायदा झाला आहे. तो एका स्थानाने वर चढला आह. तो आता दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांना फटका बसला आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांचा प्रत्येकी एक गुण कमी झाला आहे. तर शुभमन गिलने ३ गुण गमावले आहेत. गेल्या आठवड्यात गिल सहाव्या क्रमांकावर विराजमान होता. पण लॉर्ड्स कसोटीनंतर तो नवव्या क्रमांकावर घरसला आहे. दुसरीकडे, जयस्वाल चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणि पंत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे.
Star batter reclaims top spot in ICC Men’s Test Rankings following a stellar performance at Lord’s 👏https://t.co/W2lRQdbUMq
— ICC (@ICC) July 16, 2025
हेही वाचा : IND Vs ENG : रोहित-कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा डाव? बोर्डाच्या भूमिकेने क्रीडा विश्वात खळबळ..
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, आत्मविश्वासाने भरलेला भारतीय महिला संघ बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही तीच लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. आज सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. भारतीय संघाने टी-२०० मालिका ३-२ अशी जिंकून नवा इतिहास रचला. खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळला जाणार आहे आणि त्या दृष्टीने, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ५० षटकांच्या स्वरूपातही आपली कामगिरी सुधारू इच्छितो.