ऋषभ पंतच्या चुकीमुळे कांगारूंना अतिरिक्त 25 धावांचा फायदा
ICC Test Rankings : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात किवींनी टीम इंडियाला व्हाईट वॅाश दिला. यामध्ये भारताचे अनेक दिग्गज अपयशी ठरले. भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली हा सपशेल फ्लॅाप ठरला. अत्यंत खराब कामगिरीमुळे विराट ICC टेस्ट रॅंकींगमध्ये कोहलीला कमालीचा फटका बसला आहे. तर या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतने टेस्ट रॅंकींगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
ICC रॅंकींगमध्ये ऋषभ पंतची मोठी झेप
ऋषभ पंतने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात चांगली खेळी करीत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. यामध्ये अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी ऋषभचे तोंडभरून कौतुक केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा ऋषभच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याच्या या खेळीने ICC रॅंकींगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. त्याने टॅाप-10 मध्ये प्रवेश करीत थेट 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट टॅाप 20 मधून बाहेर
ICC ने कसोटीतील फलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. ICC च्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. बाबर आझम याचेही मोठे नुकसान झाले आहे. विराट कोहली सध्या फलंदाजांच्या ICC कसोटी क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा २६ व्या क्रमांकावर आहे.
विराटचा दबदबा पडला मागे
आश्चर्याची गोष्टी आहे की 10 वर्षांनंतर विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. यापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये त्याला टॉप-20 फलंदाजांमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर सलग 10 वर्षे विराटचा दबदबा कायम राहिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याची बॅट शांत आहे आणि तो क्रमवारीत सातत्याने मागे पडत आहे.
बाबर आझमचेही मोठे नुकसान
ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबर आझमची सध्या 17व्या स्थानावर घसरण झाली आहे. बाबरची बॅटही गेल्या वर्षभरापासून शांत आहे. याच कारणामुळे त्याला पाकिस्तानच्या कसोटी संघातूनही वगळण्यात आले होते. बाबर आझमला कसोटीच्या शेवटच्या 18 डावात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम
ICC च्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 903 गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तिसऱ्या स्थानावर आहे. भारताची युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ७७७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे 757 गुण आहेत.
टॉप-10 मध्ये दोन भारतीयांचा समावेश
ICC कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या टॉप-10 मध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आहे. पंतचे ७५० गुण आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल सातव्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आठव्या क्रमांकावर, पाकिस्तानचा सौद शकील नवव्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन दहाव्या क्रमांकावर आहे.