ICC Women's T20 World Cup 2024 IND VS SL
ICC Women’s T20 World Cup 2024 INDW vs SLW : महिला T20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात आज टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी बाद 172 धावा केल्या. अशाप्रकारे श्रीलंकेच्या समोर चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील १७३ धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने तुफानी खेळी केली. भारतीय कर्णधाराने 27 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला. तर सलामीवीर स्मृती मानधनाने 38 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. याशिवाय शेफाली वर्माने 40 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू आणि आना कांचना यांनी 1-1 बळी घेतला.
कर्णधार हरमनप्रीतचे झंझावती अर्धशतक
Captain #HarmanpreetKaur leads by example! 💯
What a six that was! 💥 (only available in India)
Watch 👉🏻 #INDvSL on #WomensWorldCupOnStar | LIVE NOW on Star Sports Network & Disney+Hotstar pic.twitter.com/xyfYH7Z8Uy
— Star Sports (@StarSportsIndia) October 9, 2024
श्रीलंकेची फलंदाजी
भारताने धमाकेदार खेळी करीत श्रीलंकेसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवत बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंका 173 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. परंतु, त्यांची सुरुवातच निराशाजनक राहिली. सलामी जोडी अवघ्या 1 धावा करून तंबूत परतली. कर्णधार चामरी अट्टापथ्तू पूर्णपणे अपयशी ठरली. त्यानंतर हृषिता, कविषा, अनुष्का, निलाक्षी यांची खेळी सुद्धा श्रीलंकेचा डाव सावरू शकली नाही.
भारताची भेदक गोलंदाजी
The #WomenInBlue pick up their 1️⃣st wicket through #RenukaSingh! 😍
What a catch by #RadhaYadav! 🫴💙
Watch 👉🏻 #INDvSL on #WomensWorldCupOnStar | LIVE NOW on Star Sports Network & Disney+Hotstar pic.twitter.com/UiI1MOvLC1
— Star Sports (@StarSportsIndia) October 9, 2024
भारताची गोलंदाजी
श्रीलंकेकडून कविशा दिहारी आमि अनुष्का संजीवनी चांगली खेळी केली परंतु ते श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या.
भारताकडून रेणुका सिंगने चांगली गोलंदाजी केली तिने 2 विकेट घेतल्या, तर अरुंधती रेड्डीने आजसुद्धा 2 विकेट घेतल्या तर आशा शोभना सुद्धा 2 विकेट घेतल्या