AFG vs HK Head to Head And Playing 11: आशिया कप 2025 चा थरार (Asia Cup 2025) आजपासून (मंगळवार, 9 सप्टेंबर) सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला आणि उद्घाटन सामना अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता अफगाणिस्तान आणि हाँगकाँग (AFG vs HK) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ टी-20 फॉरमॅटमध्ये त्यांच्या आक्रमक खेळासाठी ओळखले जातात, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात 2014 पासून आतापर्यंत एकूण 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी अफगाणिस्तानने 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर हाँगकाँगने 2 सामने जिंकले आहेत. आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते की, अफगाणिस्तानचे पारडे जड आहे, पण हाँगकाँगनेही आपल्या दमदार खेळाने प्रतिस्पर्धकांना धक्का देण्याचे काम केले आहे.
While Hong Kong holds two T20I wins over Afghanistan, can they really challenge the modern might of an Afghan side that has tested even the best teams? pic.twitter.com/whzXjbVJPB
— CricTracker (@Cricketracker) September 9, 2025
अबू धाबीची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे धावा सहज काढता येतात, पण गोलंदाजांनाही त्यांची भूमिका बजावण्याची संधी मिळेल. वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूने मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात.
Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ
हाँगकाँग आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ त्यांच्या टी-20 मधील आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. अफगाणिस्तानचा अनुभव आणि अष्टपैलू खेळाडूंची उपस्थिती त्यांना आघाडी देऊ शकते, पण हाँगकाँगच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली तर सामना अधिक रोमांचक होईल. आशिया कपमधील हा सुरुवातीचा सामना दोन्ही संघांच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचा ठरेल.
हाँगकाँग संघ: झिशान अली (यष्टीरक्षक), बाबर हयात, निजाकत खान, अंशुमान रथ, मार्टिन कोएत्झी, यासिम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, नसरुल्ला राणा, एहसान खान, अली हसन, अतीक इकबाल, कल्हण चल्लू, आयुष शुक्ला, किंचित शाह, मोहम्मद वाहिद, शाहिद वासिफ आणि मोहम्मद गजनफर.
अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, इब्राहिम जाद्रान, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक, शराफुद्दीन अशरफ आणि गुलबदीन नायब.
अफगाणिस्तान प्लेइंग-11: राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, सेदीकुल्ला अटल, दरविश रसूली, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक.
हाँगकाँग संभाव्य प्लेइंग-11: यासीम मोर्तझा (कर्णधार), अंशी रथ, मार्टिन कोएत्झी, किंचित शाह, शाहिद वसीफ, झीशान अली (यष्टीरक्षक), एजाझ खान, निजाकत खान, अतिक इक्बाल, अली हसन, एहसान खान.