Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”

आशिया कपपूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. विजयासाठी 'आक्रमकता' खूप महत्त्वाची असल्याचे तो म्हणाला. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्याचे हे विधान चर्चेत आहे. सविस्तर वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 09, 2025 | 03:39 PM
Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”
Follow Us
Follow Us:
  • आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी
  • पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने अनेक विषयावर केले भाष्य
  • टीम इंडिया कोणताही प्रयोग करणार नाही
आशिया कप 2025 चा थरार (Asia Cup 2025) आज (9 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने स्पष्ट केले आहे की, आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात त्यांचा संघ आपल्या आक्रमक पवित्र्यापासून अजिबात मागे हटणार नाही. भारतीय संघाचे आशिया कप अभियान बुधवार, 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जेव्हा संघ ग्रुप-ए मधील आपल्या पहिल्या सामन्यात युएई संघाशी भिडेल. त्यानंतर, रविवार, 14 सप्टेंबर रोजी बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना होईल. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘आक्रमकता खूप आवश्यक आहे’

स्पर्धेच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला की, “आक्रमकता नेहमी मैदानात असते आणि जिंकण्यासाठी ती खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला जिंकायचे असेल, तर आक्रमकतेशिवाय काम चालणार नाही.” सूर्यकुमारने हे देखील सांगितले की, त्याच्या संघातील वातावरण सकारात्मक असून, खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे. “आम्ही काही चांगले सराव सत्र केले आहेत. आशिया कपमधील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळणे एक मोठे आव्हान असेल,” असेही तो म्हणाला.

Salman Ali Agha and Suryakumar Yadav responded to the question related to holding their temper and aggression on ground considering the situation between two countries. VC: ACC#Cricket | #Pakistan | #SalmanAliAgha | #SuryakumarYadav | #Sharjah | #India pic.twitter.com/Gi5mXjxKnP — Khel Shel (@khelshel) September 9, 2025


सूर्यकुमारच्या या विधानानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने आक्रमकतेवर आपली प्रतिक्रिया दिली. “जर कोणाला आक्रमक व्हायचे असेल, तर तो त्याचा निर्णय आहे,” असे तो म्हणाला. त्याने सांगितले की, तो आपल्या कोणत्याही खेळाडूला याबद्दल विशेष सूचना देत नाही.

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

टीम इंडिया कोणताही प्रयोग करणार नाही

युएई या स्पर्धेत ‘अंडरडॉग’ (अपेक्षित विजय न मिळवणारा) मानला जात असला, तरी सूर्यकुमारने त्यांना हलक्यात घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, “युएई उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे आणि त्यांनी नुकत्याच झालेल्या टी-20 ट्राय-सिरीजमध्ये काही सामने जिंकले आहेत. मला आशा आहे की ते आशिया कपमध्येही चांगली कामगिरी करतील.”

जेव्हा सूर्याला विचारले की भारत सुरुवातीच्या सामन्यात काही प्रयोग करेल का, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. “जेव्हा तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळता, तेव्हा तुम्हाला तुमच्या तयारीची पातळी माहीत असते. जर एखाद्या गोष्टीमुळे आम्हाला चांगले निकाल मिळत असतील, तर त्यात बदल का करायचा? जी पद्धत काम करत आहे, त्यात बदल करण्याची गरज नाहीये,” असे तो म्हणाला.

Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ

आशिया कप 2025साठी भारतीय संघ:

  • मुख्य खेळाडू: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
  • राखीव खेळाडू: प्रसिद्ध कृष्णा, वाशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल.

Web Title: Asia cup india vs pakistan suryakumar yadav statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports
  • Sports News
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.