WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारत कितव्या स्थानावर (फोटो सौजन्य - X.com)
सोमवारी ओव्हल येथे झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
भारताच्या या विजयासह, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (ICC WTC पॉइंट्स टेबल) पॉइंट्स टेबलमध्ये प्रचंड बदल झाला आहे. या विजयानंतर, भारतीय संघ WTC पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारताची विजयाची टक्केवारी ४६.६६ आहे. नवीन WTC सायकलमध्ये भारताने पाच सामने खेळले, त्यापैकी दोन जिंकले आणि दोन गमावले. एक सामना अनिर्णित राहिला.
कुठे आहे इंग्लंडचे स्थान
दुसरीकडे, इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर, ते एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. इंग्लंडचा ४३.३३ टक्के आहे. तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियन संघ WTC पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी सध्याच्या WTC सायकलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
भारत-इंग्लंड सामन्याची स्थिती
शेवटच्या सामन्यात ओव्हल येथे प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर सर्वबाद झाला. यजमान संघाने पहिल्या डावाच्या आधारे २३ धावांची आघाडी मिळवली.
यानंतर, भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या मदतीने ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना, संपूर्ण इंग्लंड संघ ८५.१ षटकांत ३६७ धावांवर सर्वबाद झाला. धावांच्या बाबतीत भारतीय संघाने कसोटी इतिहासातील सर्वात लहान विजय नोंदवला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला आणि सिराजने आपले सर्वस्व पणाला लावत हा सामना भारताला जिंकवून दिला. एक क्षण असा आला होता ज्यामुळे सिराजच्या हातून ब्रुकचा कॅच सुटल्याने हा सामना सर्वस्वी गमावला जाणार अशीच स्थिती होती. मात्र स्वतःवरील विश्वास सार्थ करत सिराजने भारताच्या झोळीत हा सामना झुकवला.
IND vs ENG 5th Test: क्षणात पालटले! इंग्लंडचे स्वप्नं मिळवले धुळीला! सिराज-प्रसिद्धने खेचून आणली मॅच, सिरीज अनिर्णित
WTC पॉइंट्स टेबलची स्थिती
क्रमांक | संघ | सामने | किती जिंकले | पराभव | अनिर्णित | पॉईंट्स | टक्केवारी |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | ऑस्ट्रेलिया | 3 | 3 | 0 | 0 | 36 | 100 |
2 | श्रीलंका | 2 | 1 | 0 | 1 | 16 | 66.66 |
3 | भारत | 5 | 2 | 2 | 1 | 28 | 46.66 |
4 | इंग्लंड | 5 | 2 | 2 | 1 | 26 | 43.33 |
5 | बांग्लादेश | 2 | 0 | 0 | 1 | 4 | 16.17 |
6 | वेस्ट इंडिज | 3 | 0 | 3 | 0 | 0 | 0 |
न्यूझीलँड | मॅच खेळ बाकी | ||||||
पाकिस्तान | मॅच खेळ बाकी | ||||||
दक्षिण आफ्रिका | मॅच खेळ बाकी |
टेस्ट क्रिकेटची आजची स्थिती
𝐈𝐭’𝐬 𝐰𝐡𝐲 𝐰𝐞 𝐥𝐨𝐯𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 ❤️
#WTC27 | 📝 #ENGvIND: https://t.co/SNl4Ym0LJt pic.twitter.com/KfWOGRSgsV
— ICC (@ICC) August 4, 2025