Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर

एकीकडे यजमान श्रीलंकेने सलग तीन सामने जिंकून 'सुपर-८' फेरीतील आपले स्थान निश्चित केले असतानाच, दुसरीकडे संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज स्पर्धेतुन बाहेर पडला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 06:18 PM
सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! (Photo Credit- X)

सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले!
  • दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
  • प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाची भूमिका
Matheesha Pathirana News: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार सध्या भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली रंगत आहे. एकीकडे यजमान श्रीलंकेने सलग तीन सामने जिंकून ‘सुपर-८’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले असतानाच, दुसरीकडे संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आणि ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’ मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे श्रीलंकेच्या सुपर-८ च्या मोहिमेला मोठे खिंडार पडले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १६ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पथिरानाला ही दुखापत झाली. या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, गोलंदाजी करताना आपल्या स्पेलमधील चौथ्या चेंडूवर पथिरानाच्या डाव्या पायाच्या स्नायूंना ताण आला आणि तो वेदनेने ग्रासलेला दिसला. फिजिओंच्या मदतीनंतरही तो पुन्हा मैदानात येऊ शकला नाही. आता स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर, ही दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असून तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही.

A potential big blow for Sri Lanka 🤕 Matheesha Pathirana, who’d had gone down clutching his left leg during the game against Australia, is likely to be ruled out of the T20 World Cup after scans revealed a calf strain that may take several weeks to heal pic.twitter.com/kCR66IlCAk — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 18, 2026

RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 

प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाची भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचे फलंदाजी सल्लागार विक्रम राठौर यांनी पथिरानाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “पथिरानाचा बाहेर पडणे हा संघासाठी मोठा तोटा आहे. त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, याबाबत संघ व्यवस्थापन चर्चा करत आहे. अधिकृतरीत्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल.” पथिरानाच्या जागी दुशमंथा चमीरा किंवा एखाद्या युवा गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वानिंदू हसरंगानंतर दुसरा मोठा झटका

श्रीलंकेसाठी हे विश्वचषक दुर्दैवी ठरत असल्याचे दिसत आहे. पथिरानाच्या आधी श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू आणि माजी कर्णधार वानिंदू हसरंगा देखील दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. हसरंगा आणि पथिराना हे दोघेही श्रीलंकेच्या गोलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ होते. सुपर-८ सारख्या महत्त्वाच्या फेरीत हे दोन्ही प्रमुख खेळाडू नसल्याने कर्णधार चरित असलंकाच्या चिंतेत भर पडली आहे.

पुढील प्रवास आणि आव्हाने

श्रीलंकेचा संघ सध्या ग्रुप-बी मध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांना १९ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीपासून त्यांचा सुपर-८ चा प्रवास सुरू होईल. सुपर-८ मधील त्यांचा पहिला सामना बलाढ्य इंग्लंड विरुद्ध पल्लेकेले येथे होणार आहे. महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी गोलंदाजीतील ही मोठी पोकळी श्रीलंका कशी भरून काढणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Web Title: Sri lankas tension rises ahead of super 8s match winning bowler out of world cup due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • cricket news
  • Matheesha Pathirana
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क
1

जिद्द, मेहनत अन् सुवर्णपदक! अंध महिला क्रिकेट संघाचा प्रेरणादायी प्रवास पाहून महाराष्ट्राचे राज्यपालही झाले थक्क

पर्वणीच पर्वणी! 2027 मध्ये कधी होणार Asia Cup? टी 20 नव्हे तर आता…; समोर आल्या तारखा
2

पर्वणीच पर्वणी! 2027 मध्ये कधी होणार Asia Cup? टी 20 नव्हे तर आता…; समोर आल्या तारखा

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट
3

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल
4

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.